पंचगंगा नदी घाट : गंगावेश चौक, तोरस्कर चौक, तसेत छत्रपती शिवाजी पुलाकडून पंचगंगा नदी घाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणाहून केवळ गणेश विसर्जनसाठी आलेल्या वाहनांनाच सोडले जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ब्रह्मपुरी टेकडी येथे वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
इराणी खण : संभाजीनगर चौक ते क्रशर चौक, फुलेवाडी नाका ते क्रशर चौक, अंबाई टॅंक ते क्रशर चौक, रंकाळा टाॅवर ते क्रशर चौक हे सर्व मार्ग अवजड वाहतूक अन् खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आली आहेत. या मार्गांवर फक्त गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. रावजी मंगल कार्यालय, संभाजीनगर एस.टी. स्टँड, राज कपूर पुतळा ते देवकर पाणंद पेट्रोल पंप मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करण्याची परवानगी देण्यात आली आहे. फुलेवाडीकडून शहरात येणारी वाहने नवीन वाशी नाका, कळंबा, संभाजीनगरमार्गे शहरात जातील.
advertisement
राजाराम तलाव : शिवाजी विद्यापीठाच्या समोरून सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून फक्त गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
राजाराम बंधारा : कसबाबावडा परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन राजाराम बंधाऱ्यावर केले जाते, या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या परिसरात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून एम.एस.पी.एफ. कॅम्पकडून राजाराम बंधाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिंजारगल्लीतून राजाराम बंधाऱ्याकडे केवळ विसर्जनसाठी आलेली वाहने सोडण्यात येणार आहेत. या परिसरात पार्किंगची जागेअभावी गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी मोठी वाहने आणू नयेत, असंही पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
कोटीतीर्थ तलाव : या आवारातील शाहू मिल ते पंत वालवलकर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर खासगी वाहतूक बंद करम्यात आलेली आहे. या ठिकाणी फक्त गणेश विसर्जनासाठी आलेल्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी पार्किंग करायचं असेल तर शाहू मिलची समोरील जागा रस्त्याकडेला करावी, पण वाहतुकीला अडथडळा होणार नाही, अशा पद्धत्तीने पार्किंग करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
हे ही वाचा : Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते