Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ratnagiri Traffic: रत्नागिरीत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
रत्नागिरी : गौरी-गणपतीचा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीला रस्त्यांवर मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
रत्नागिरीत मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 4 सप्टेंबर रोजी 9 दिवसांचे गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि 7 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी देखील सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका- राधाकृष्ण नाका – गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
view commentsरत्नागिरीतील रामनाका-तेलीअळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका- मत्स्यालय-मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
September 02, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते


