साखरेमुळेही आजार होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे आजपासूनच साखर खाणं टाळा. साखरेपासून बनवलेली
मिठाई खायला सगळ्यांनाच आवडते, पण या पांढऱ्या विषामुळे मधुमेह तर होतोच पण अन्य आजारांचा धोकाही वाढू शकतो. अनेकांना जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते, तरच त्यांचं जेवण पूर्ण होतं. असं
तुम्हीही करत असाल तर आताच थांबवा. कारण साखर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. साखर
advertisement
स्लो पॉयझन म्हणून काम करते.
अनेकांचा असा समज असेल की, साखर खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका असतो, पण साखरेमुळे फक्त मधुमेहच नाही तर अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. साखर खाणं शरीरासाठी घातक आहे. हृदयरोग, लठ्ठपणा, दात किडणं या सगळ्याचं मूळ अनेकदा साखर असतं
हृदयरोगाचा धोका -
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे लठ्ठपणा, जळजळ आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. ही सर्व लक्षणं
हृदयविकारासाठी जोखमीची आहेत. गोड पदार्थ आणि गोड पेयांचं सेवन केल्यानं हृदयविकाराचा झटका येण्याची आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांची शक्यता वाढते.
शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर नक्की काय होतं? कडीपत्ता दूर करेल समस्या, पाहा कसं?
लठ्ठपणा
गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे शरीरात, विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होते.
यकृतावर परिणाम -
मिठाईमध्ये आढळणाऱ्या फ्रुक्टोजच्या अतिसेवनामुळे यकृतावर परिणाम होऊ शकतो आणि चरबी वाढू शकते.
यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग होऊ शकतो, यामुळे यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते.
Garlic : सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यानं मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या दिवसात किती आणि कसे लसूण खावे?
दात किडणं -
साखर मौखिक आरोग्यासाठीही घातक आहे. यामुळे तोंडातील हानिकारक जीवाणूंना प्रोत्साहन मिळतं. यामुळे
एसिड तयार होतं आणि दातावर एक थर तयार होतो. कालांतरानं, यामुळे दात किडणं आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.
मेंदूच्या कार्यावर परिणाम -
साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे, मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. यामुळे उदासीनता आणि चिंता वाढण्याची शक्यता असते.