Garlic : सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यानं मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या दिवसात किती आणि कसे लसूण खावे?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लसूण जेवणात वापरला जातोच, पण लसणामुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर यामुळे, अनेक आजार दूर होतात. तुम्ही रिकाम्या पोटी लसणाचं सेवन केलं तर तुमच्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे होतात.
मुंबई : लसूण जेवणात वापरला जातोच, पण लसणामुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर यामुळे, अनेक आजार दूर होतात. तुम्ही रिकाम्या पोटी लसणाचं सेवन केलं तर तुमच्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत.कच्चा लसूण कोलेस्टेरॉल कमी करण्यापासून, रक्तदाब कमी करण्यापासून ते पचन संस्थेचं कार्य सुधारण्यापर्यंत सर्वच बाबतीत अत्यंत फायदेशीर आहे.
कच्च्या लसणात ऍलिसिन नावाचा घटक असतो, ज्यामध्ये, दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लसणाच्या
एका पाकळीत 4 कॅलरीज असतात आणि 1 ग्रॅमपेक्षा कमी लसणात प्रथिनं, कर्बोदकं मुबलक
प्रमाणात असतात.त्यात व्हिटॅमिन सी, ए आणि बी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळतात.
advertisement
रोगप्रतिकारशक्ती वाढवते :
लसूण खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले ॲलिसिन
हे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवते.
हृदयासाठी फायदेशीर :
advertisement
लसणाचं नियमित सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लसूण रक्तदाब आणि
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. लसणात असलेला सल्फर घटक
रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.
advertisement
पचनक्रिया सुधारते :
सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्यानं पचनक्रिया मजबूत होते. लसणातील शक्तिशाली गुणधर्म पचनासाठी फायदेशीर ठरतात.
लसणामध्ये प्रीबायोटिक गुणधर्म असतात जे आतड्यांतील बॅक्टेरिया तयार करतात त्यामुळे पचनव्यवस्था
advertisement
सुधारण्यासाठी मदत होते.
शरीरासाठी उपयुक्त:
लसणामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. लसणात असलेले
एलिसिन यकृताचं कार्य चांगलं करण्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्यामुळे हानिकारक पदार्थ काढून
टाकण्यात मदत होते.
साखर नियंत्रणासाठी फायदेशीर :
advertisement
लसूण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लसणाचा उपयोग प्रामुख्यानं,
प्रीडायबेटिस किंवा टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे.
लसूण कसा खावा -
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या पाण्यात भिजवा.
सकाळी एक चमचा देशी तुपात चांगलं तळून घ्या आणि नंतर रिकाम्या पोटी सेवन करा.
यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2024 5:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Garlic : सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यानं मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या दिवसात किती आणि कसे लसूण खावे?