Amla Benefits : आरोग्यदायी आवळा, आहारात करा आवळ्याचा समावेश,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आवळा बहुतेकांना आवडतो. चवीसाठी, आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त आहे.
मुंबई : आवळा बहुतेकांना आवडतो. चवीसाठी, आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त आहे. आवळा सेवनाचे शरीराला अनेक फायदे आहेत. आवळ्यामध्ये असलेली जीवनसत्व क, जीवनसत्व अ, बी कॉम्प्लेक्स, कर्बोदकं, आवश्यक तंतुमयता, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त -
आवळ्यामध्ये असलेले जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ डोळ्यांसाठी चांगलं आहे. आवळा रोज खाल्ल्यानं दृष्टी सुधारण्यास मदत होते.
रोग प्रतिकारशक्ती -
advertisement
आवळ्यामध्ये असलेलं जीवनसत्त्व क हा शरीरासाठी चांगला स्रोत मानला जातो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
आवळ्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आवळ्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
advertisement
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त -
आवळा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता.
मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त -
आवळा इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. आवळ्याच्या सेवनामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकतात. आवळ्यातील क जीवनसत्त्वामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे स्वादूपिंडाचं कार्य सक्रिय राहून इन्सुलिनचं उत्पादनही सक्रिय राहण्यात मदत होते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
advertisement
पचनासाठी उपयुक्त -
आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही आवळा खाऊ शकता, आवळा खाणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
केसांसाठी फायदेशीर -
आवळा केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप चांगला मानला जातो. केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे.अनेक जण केसांच्या वाढीसाठी पोषक म्हणून आवळ्याच्या तेलाचा वापर करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Amla Benefits : आरोग्यदायी आवळा, आहारात करा आवळ्याचा समावेश,वजन कमी करण्यासाठी उपयुक्त