TRENDING:

पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली, मंगरुळपीरमध्ये मिळाला 6,000 रु दर, भाव आणखी कडाडणार का?

Last Updated:
soyabean bajarbhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या सोयाबीनच्या भावांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे.
advertisement
1/6
सोयाबीनची आवक वाढली, मंगरुळपीरमध्ये मिळाला 6,000 रु दर, भाव आणखी कडाडणार का?
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या सोयाबीनच्या भावांमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला आहे. काही ठिकाणी सोयाबीनला 6 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला तर काही ठिकाणी मात्र दर 3000 रुपयांपर्यंत दर खाली आले.
advertisement
2/6
आजचा दर काय? 27 नोव्हेंबर रोजी जळगाव बाजार समितीत लोकल जातीला 4375 ते 4511 रुपये दर मिळाला तर सरासरी दर 4400 रुपये होता. नागपूर बाजारात मोठी आवक असून सुद्धा दर 3700 ते 4575 रुपयांदरम्यान राहिला. चाकूर बाजारात पिवळ्या जातीला 4251 ते 4600 रुपये असा मजबूत दर मिळाला आणि सरासरी 4475 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला.
advertisement
3/6
तर दुसरीकडे बुधवारी (26 नोव्हेंबर) येवला बाजार समितीत दर 3800 ते 4465 रुपयांदरम्यान राहून सरासरी 4400 रुपये नोंदवले गेले. शहादा बाजारात सरासरी 4300 रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक 155 क्विंटल असूनही सरासरी दर 3954 रुपये इतका कमी होता.
advertisement
4/6
नांदेड, चंद्रपूर, पाचोरा अशा काही बाजारांमध्ये दर 3300 ते 4500 रु मिळाला. कारंजा बाजार समितीत मात्र तब्बल 11 हजार क्विंटलची मोठी आवक झाली आणि सरासरी दर 4275 रुपये राहिला. सोलापूर, श्रीरामपूर, वडवणी इथे सरासरी दर 4400 रुपयांदरम्यान स्थिर होता.
advertisement
5/6
मंगरुळपीर बाजारसमितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर -  विदर्भातील वाशीम आणि मंगरुळपीर येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला. वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनचा जास्तीत जास्त दर 6000 रुपये नोंदवला गेला आणि सरासरी दर 5500 रुपये राहिला. मंगरुळपीरमध्येही जास्तीत जास्त दर 5650 रुपये मिळाला, तर सरासरी दर 5500 रुपये होता.
advertisement
6/6
काही बाजार समित्यांमध्ये मात्र दर घसरलेले आढळले. हिंगणघाट, वणी, भद्रावती या बाजारांमध्ये सोयाबीनचा दर 1000 ते 3500 रुपयांपर्यंत खाली आला. भद्रावती बाजारात तर किमान दर 1000 रुपये नोंदवला गेला. ज्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली, मंगरुळपीरमध्ये मिळाला 6,000 रु दर, भाव आणखी कडाडणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल