TRENDING:

The 50 : निक्की तांबोळी घेणार बदला? कानाखाली मारणारी 'ती' पुन्हा समोर येणार

Last Updated:
निक्की तांबोळीच्या कानाखाली मारणारी ती पुन्हा निक्कीसमोर येणार आहे. The 50 या शोमध्ये पुन्हा राडा होणार.
advertisement
1/9
The 50 : निक्की तांबोळी घेणार बदला?  कानाखाली मारणारी 'ती' पुन्हा समोर येणार
एकीकडे बिग बॉस मराठी 6 सुरू असताना दुसरीकडे कलर्स टीव्हीवरील The 50 हा शो येत्या 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये अभिनेत्री, मॉडेल निक्की तांबोळी देखील सहभागी झाली आहे.
advertisement
2/9
शो सुरू होण्याआधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे या शोमध्ये निक्कीची दुश्मन देखील दिसणार आहे. जिने निक्कीच्या कानाखाली मारली होती ती पुन्हा निक्कीसमोर उभी ठाकणार आहे.  निक्की तांबोळी  बदला घेणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडाल आहे.
advertisement
3/9
निक्की तांबोळी बिग बॉस मराठी 5 मध्ये होती. बिग बॉस मराठी 5 मध्ये निक्कीचं एका स्पर्धकासोबत खूप मोठं भांडण झालं होतं. त्या स्पर्धकानं निक्कीच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे त्या स्पर्धकाला घराबाहेर काढण्यात आलं होतं. तीच स्पर्धक आता The 50 मध्ये निक्कीच्या समोर येणार आहे.
advertisement
4/9
आपण बोलत आहोत ती अमरावतीची मुलगी म्हणजेच रॅपर आर्या जाधव हिच्याबद्दल.  आर्या जाधव पुन्हा एकदा निक्कीसमोर उभी ठाकणार आहे.
advertisement
5/9
बिग बॉस मराठी 5 च्या घरात निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यात सुरुवातीपासूनच मतभेद दिसून येत होते. हे मतभेद हळूहळू भांडणात रूपांतरित झाले आणि एका टप्प्यावर वाद इतका टोकाला गेला की आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली होती.
advertisement
6/9
या घटनेनंतर निक्की आणि आर्या पुन्हा कधीही एकत्र दिसल्या नव्हत्या. मात्र आता The 50 या नव्या शोमुळे दोघी पहिल्यांदाच पुन्हा आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे जुना राग आणि वाद पुन्हा उफाळून येणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
7/9
आर्या जाधव ही MTV Hustle 2.0मधून घराघरात पोहोचली. तिचं 'नऊवारी' हे रॅप साँग प्रचंड गाजलं होतं.
advertisement
8/9
बिग बॉसनंतर तिला टीकेला सामोरं जावं लागलं पण The 50मुळे आर्याला पुन्हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
9/9
The 50मध्ये बिग बॉस मराठीचे इतर स्पर्धकही आहेत. ज्यात शिव ठाकरे, जान्हवी किल्लेकर आणि अरबाज पटेल यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
The 50 : निक्की तांबोळी घेणार बदला? कानाखाली मारणारी 'ती' पुन्हा समोर येणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल