TRENDING:

Shukra Uday 2026: वाट बघायची तर किती? माघी पौर्णिमेला शुक्राचा उदय, 3 राशींकडे येणार मनासारखा पैसा

Last Updated:
Shukra Uday 2026: हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला खूप शुभ मानलं जातं. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. यंदा माघ पौर्णिमेचा दिवस खास शुभ मानला जात आहे, कारण या दिवशी शुक्र ग्रह अस्तातून उदयाला येणार आहेत. वैदिक ज्योतिषानुसार वेळोवेळी ग्रहांची स्थिती बदलत असते आणि त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो.
advertisement
1/5
वाट बघायची तर किती? माघी पौर्णिमेला शुक्राचा उदय, 3 राशींकडे येणार मनासारखा पैसा
धन, ऐश्वर्य आणि वैभव देणारे शुक्र ग्रह 1 फेब्रुवारी रोजी उदयाला येत आहेत. शुक्र ग्रह आपल्या उच्च राशी मीनमध्ये उदयाला येणार असल्यामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होण्याची शक्यता आहे. या राशींना धन-दौलतीत मोठी वाढ होऊ शकते. चला तर जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/5
1 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह उदयाला आल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभ स्थानात उदयाला येणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो.
advertisement
3/5
वृषभ राशीच्या लोकांच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योगही दिसून येतो. या काळात व्यापारी लोक एखादी मोठी बिझनेस डील करू शकतात, ज्याचा भविष्यात चांगला फायदा होईल.
advertisement
4/5
शुक्र ग्रहाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून कर्म भावात उदयाला येणार आहेत. त्यामुळे कामधंद्यात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. कमी प्रयत्नांतही धनप्राप्ती होऊ शकते. या काळात वडिलांशी असलेले संबंध अधिक चांगले राहतील.
advertisement
5/5
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचा उदय फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून लग्न भावात उदयाला येणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरात सकारात्मक वातावरण राहील आणि मानसिक शांततेचा अनुभव येईल. विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन सुखकर आणि आनंदी राहील. तर अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Uday 2026: वाट बघायची तर किती? माघी पौर्णिमेला शुक्राचा उदय, 3 राशींकडे येणार मनासारखा पैसा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल