शेतीपिकांचे मोठे नुकसान, अनेक घरांची पडझड, जनावरेही दगावली, नाशिकमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिक जिल्ह्यातील शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार वादळी पावसाने जिल्ह्यातील 68 हजार 554 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामध्ये चांदवड, देवळा, पेठ, सिन्नर, नाशिक आणि निफाड यासारख्या भागाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा 805 गावातील तब्बल 76 हजार 558 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.
advertisement
1/5

2/5
परतीच्या पावसामुळे चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. तसेच चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने पावसाचे पाणी शिरून 100 घरे व 43 दुकानांचे नुकसान झाले आहे. तसेच 35 घरांची पडझड देखील झाली आहे. इतकेच नव्हे तर 23 जनावरे मृत्युमुखी पडली आहे.
advertisement
3/5
परतीच्या पावसाने देवडा शहरातून जाणाऱ्या कुल्फी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच कापशी, भिलवाड, वखारी या गावांना मोठा फटका बसला आहे. या भागतील 7 घरांची पडझड तर 54 घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
advertisement
4/5
नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. चांदवडमध्ये सर्वाधिक 10992 हेक्टरवर वरील पिकांचे नुकसान झाले असून त्या खालोखाल देवळा 8236, सटाणा 8853, पेठ 6230, इगतपुरी 1831, निफाड 806, येवला 1076, मालेगाव 935, नाशिकमध्ये 750 तर कळवण 341, त्रंबकेश्वर 433, सुर्गान 666, दिंडोरी 105 याप्रमाणे सर्व तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
advertisement
5/5
तसेच कांद्याचे आणि मक्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कांद्याचे 12,961 हेक्टर, मका 11,584, भात 9048, सोयाबीन 326, भाजीपाला 2958, कांदा रोपवाटिकेचे 642, द्राक्षाचे 624, डाळिंबाचे 408 इतके हेक्टरी नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
शेतीपिकांचे मोठे नुकसान, अनेक घरांची पडझड, जनावरेही दगावली, नाशिकमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार