TRENDING:

महाराष्ट्रात या शेतीचा ट्रेंड वाढला! एकदाच लागवड अन् 50 वर्षे उत्पन्न, वर्षाला करा 8 लाखापर्यंत कमाई

Last Updated:
Agriculture News : राज्यातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नव्या आणि अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत.
advertisement
1/5
महाराष्ट्रात या शेतीचा ट्रेंड वाढला! एकदाच लागवडकरा अन् 50 वर्षे उत्पन्न मिळवा
राज्यातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नव्या आणि अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत खजूर शेती हा एक अत्यंत फायदेशीर आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून पुढे येत आहे. कोरडे व उष्ण हवामान, कमी पाणी आणि तुलनेने कमी देखभाल या वैशिष्ट्यांमुळे खजूर पिकाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केली तर खजूर शेतीमधून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे.
advertisement
2/5
खजूर पिकासाठी 25 ते 45 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त मानले जाते. पाण्याचा योग्य निचरा होणारी, हलकी ते मध्यम आणि थोडी क्षारयुक्त जमीनही या पिकासाठी चालते, हे खजूर शेतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दुष्काळी आणि कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठीही हे पीक फायदेशीर ठरते. जून-जुलै किंवा फेब्रुवारी-मार्च हा खजूर लागवडीसाठी योग्य कालावधी मानला जातो.
advertisement
3/5
खजूर झाडांची लागवड करताना साधारण 25 ते 30 फूट अंतर ठेवले जाते. त्यामुळे एका एकरात अंदाजे 45 ते 50 झाडे लावता येतात. दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पादन मिळावे यासाठी टिश्यू कल्चर किंवा प्रमाणित नर-मादी रोपे निवडणे महत्त्वाचे असते. सुरुवातीच्या काळात ठिबक सिंचन केल्यास पाण्याची बचत होते आणि झाडांची वाढ चांगली होते.
advertisement
4/5
एकरी खजूर शेतीसाठी सुरुवातीचा खर्च थोडा जास्त मानला जातो. रोपे खरेदी, खड्डे खोदणे, लागवड, ठिबक सिंचन व्यवस्था, मजुरी, तसेच खत व औषधांवर मिळून साधारण 2.5 ते 3 लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. मात्र हा खर्च दीर्घकाळासाठी गुंतवणूक स्वरूपाचा असून पुढील अनेक वर्षे मोठा लाभ देणारा ठरतो.
advertisement
5/5
खजूर झाडांना लागवडीनंतर साधारण चार ते पाच वर्षांनी उत्पादन सुरू होते. एक झाड सरासरी 40 ते 60 किलो खजूर देते. बाजारात दर्जेदार खजूराला प्रती किलो 200 ते 500 रुपये दर मिळतो. यानुसार एका एकरातून सरासरी 6 ते 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते. योग्य व्यवस्थापन आणि चांगल्या जातींची निवड केल्यास हे उत्पन्न आणखी वाढू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
महाराष्ट्रात या शेतीचा ट्रेंड वाढला! एकदाच लागवड अन् 50 वर्षे उत्पन्न, वर्षाला करा 8 लाखापर्यंत कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल