15 लिटर दूध, 10 किलो ढेप, 2 किलो तूप, सामानाची यादी नाही, हा रेड्याचा दिवसाचा खुराक, वजन पाहून बसेल धक्का!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Big Bull: जालन्यातील कृषी प्रदर्शनात तब्बल दीड क्विंटल वजनाच्या रेड्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. पवचा खुराक देखील तसाच तगडा आहे.
advertisement
1/7

जालना शहरात नुकतेच झालेल्या गोदा कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 14 क्विंटल वजनाच्या पवन रेड्याने सगळ्यांचेच लक्ष वेधलं. छोटू भुरेवाल यांनी पवनचं कुटुंबातील सदस्याप्रमाणंच संगोपन केलं असून त्याचा खुराक देखील तसाच तगडा आहे. लोकल18 सोबत बोलताना त्यांनीच याबाबत माहिती दिली.
advertisement
2/7
“पवन हा आमचा लाडका रेडा आहे. अशाच प्रकारचे आणखी तीन रेडे आमच्याकडे आहे. आमचा पारंपारिक म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. एकूण 51 म्हशी असून पवन सगळ्यात लाडका आहे, असं भुरेवाल सांगतात.
advertisement
3/7
पवन रेड्याची दिनचर्या छोटू भुरेवाल यांनी सांगितलीये. पवन रेड्याला दररोज तब्बल 15 लिटर दूध, दहा किलो ढेप (पेंड) तर आठवड्यात दोन किलो तूप आणि इतर खाद्य असा आहार दिला जातो.
advertisement
4/7
पवनला सकाळी 5 ते 6 पेंढ्या कडबा, 4 ते 5 पेंढ्या उसाचे वाढे आणि 5 लिटर दूध, पावशेर तूप व 5 किलो ढेप असा आहार दिला जातो. तर सायंकाळच्या वेळी दहा लिटर दूध, पाव किलो तूप व 5 किलो सरकी ढेप दिली जाते.
advertisement
5/7
उज्जैन येथील एका व्यापाऱ्याने याला 3 लाख 60 हजार रुपये किमतीमध्ये विकत मागितले होते. मात्र आम्ही त्याला न विकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशींच्या नैसर्गिक रेतनातून याच्या आहारा विहाराचा काही प्रमाणात खर्च निघतो. मात्र बऱ्याचदा खिशातूनही पैसे टाकावे लागतात, असं छोटू सांगतात.
advertisement
6/7
पवन हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे संगोपन करतो. कितीही दर मिळाला तरी त्याची विक्री करत नसल्याचेही छोटू यांनी सांगितले.
advertisement
7/7
जालना शहरात सुरू गोदा कृषी प्रदर्शनामध्ये पवन या रेड्याची चर्चा होती. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये पवन हा चर्चेचा विषय ठरला. एवढ्या मोठ्या वजनाचा रेडा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
15 लिटर दूध, 10 किलो ढेप, 2 किलो तूप, सामानाची यादी नाही, हा रेड्याचा दिवसाचा खुराक, वजन पाहून बसेल धक्का!