Poultry Farming : वर्षाला 12 लाख कमावतात, पण कोंबड्यांना चारा कुठला देतात? पाहा तुमच्या फायद्याची बातमी!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अरुण शिंदे हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कुक्कुटपालन करत आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत.
advertisement
1/7

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील तरुण अरुण शिंदे हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कुक्कुटपालन करत आहे. यामध्ये बदक पालन, गिरीराज, नेक्सडनेक आणि फॅन्सी कोंबडीच्या जाती आहेत.
advertisement
2/7
कुक्कुटपालन व्यवसाय करताना अरुण शिंदे यांनी कमी खर्चात कोंबडी आणि बदकांना चारा कसा करायचा हे लक्षात घेता स्वतःच्या प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये कोंबड्यांना लागणारा चारा स्वतः बनवत आहेत. कमी खर्चात ते आजोळ्याचे दोन ते तीन बेड बनवून ते कोंबड्यांना लागणारा चारा बनवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती अरुण शिंदे यांनी दिली.
advertisement
3/7
अरुण शिंदे यांनी प्रो शक्ती ऍग्रो फॉर्ममध्ये दोन ते तीन आजोळ्याचे बेड बनवले आहेत. एका बेडमधून दररोज दोन ते तीन किलो खाद्य कोंबड्यांसाठी मिळतो.
advertisement
4/7
आजोळा हे ग्रीन फीड आहे. ते पाण्यावर तरंगत असतो. या आजोळ्यापासून कोंबड्यांना प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळतो.
advertisement
5/7
आजोळा तयार करण्यासाठी सुरुवातीला बेड तयार करावा लागतो. त्यामध्ये खाली एक इंच माती टाकावी लागते. तीन पाट्या शेणाची मिक्स रबडी तयार करावी टाकली जाते.
advertisement
6/7
त्यानंतर 100 सुपर फॉस्फेट टाकून त्यावरती सात इंच पाणी सोडून आजोळ्याचा कल्चर पाण्यात सोडून हा आजोळा तयार केला जातो. आजोळ्याचा बेड तयार करताना 50 टक्के शेडनेट असले पाहिजे.
advertisement
7/7
कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्याचा खर्च जेवढा कमी असेल तेवढा उत्पन्न या व्यवसायातून जास्त मिळते. तर या कुक्कुटपालनातून अरुण शिंदे वर्षाला 10 ते 12 लाखांची उलाढाल करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Poultry Farming : वर्षाला 12 लाख कमावतात, पण कोंबड्यांना चारा कुठला देतात? पाहा तुमच्या फायद्याची बातमी!