PM Kisan ते पीक विम्यापर्यंत! 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांसाठी कोणते बदल होणार? माहिती आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : 2026 हे नवे वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, नववर्षासोबतच अनेक महत्त्वाचे नियम, धोरणे आणि व्यवस्थांमध्ये बदल होणार आहेत.
advertisement
1/6

2026 हे नवे वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, नववर्षासोबतच अनेक महत्त्वाचे नियम, धोरणे आणि व्यवस्थांमध्ये बदल होणार आहेत. प्रत्येक नवीन वर्षात सरकारकडून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या जातात. जेणेकरून प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होईल.
advertisement
2/6
त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून कोणकोणते बदल लागू होणार आहेत. याची माहिती नागरिकांना आधीच असणे आवश्यक ठरते. येत्या वर्षात कृषी, बँकिंग, वेतन व्यवस्था, सोशल मीडिया नियम, इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये लक्षणीय बदल अपेक्षित आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, नोकरदार, उद्योजक यांच्यावर होणार आहे.
advertisement
3/6
कृषी क्षेत्रात मोठे बदल 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल अमलात येणार आहेत. उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी (Farmer Unique ID) तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
advertisement
4/6
हा आयडी पुढील काळात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, पंतप्रधान पीक विमा योजना, पीएम किसान योजना तसेच इतर शासकीय अनुदान आणि लाभ मिळवण्यासाठी तो अनिवार्य केला जाणार आहे. युनिक आयडी नसल्यास थेट बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
5/6
याशिवाय पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यासच विमा मिळत होता. मात्र, 2026 पासून प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.
advertisement
6/6
मात्र यासाठी नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत अधिकृत अहवाल (रिपोर्ट) दाखल करणे बंधनकारक असेल. वेळेत तक्रार न केल्यास विम्याची रक्कम मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
PM Kisan ते पीक विम्यापर्यंत! 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांसाठी कोणते बदल होणार? माहिती आली समोर