TRENDING:

ज्याची भीती होती तेच घडणार! त्रिग्रही योगामुळे या राशींच्या लोकांच्या आरोग्यासह पैशांचं नुकसान होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार 30 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करत आहे. या ठिकाणी आधीच सूर्य आणि केतु हे ग्रह विराजमान असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे.
advertisement
1/4
ज्याची भीती होती तेच घडणार! त्रिग्रही योगामुळे 'या' राशींवर मोठं संकट येणार
<strong>वृषभ राशी -</strong>   त्रिग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम घेऊन येईल. कौटुंबिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे. लहानसहान गोष्टींवरून मन खिन्न होऊ शकतं. घरातील जबाबदाऱ्या अचानक वाढतील. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास डोकेदुखी, थकवा किंवा झोपेचे विकार उद्भवू शकतात. पैशांबाबत विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं ठरेल, अन्यथा आर्थिक ताण वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी गैरसमज टाळा. अनावश्यक वाद टाळल्यास करिअरवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येईल.
advertisement
2/4
<strong>कन्या राशी - </strong>  कन्या राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा बोजा वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक ताण जाणवेल. वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त राहतील, त्यामुळे दबाव वाढू शकतो. या काळात संयम आणि नियोजन महत्त्वाचं ठरेल. घरगुती जीवनात मतभेद टाळा, नात्यांमध्ये संवाद टिकवून ठेवा. पैशांबाबत मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पुढे जा. जास्त मेहनत करावी लागेल, मात्र त्याचे परिणाम थोड्या उशिराने मिळतील. आर्थिक स्थितीत अस्थिरता दिसून येईल, त्यामुळे बचत महत्त्वाची ठरेल.
advertisement
3/4
<strong>मकर राशी - </strong> मकर राशीच्या लोकांसाठी हा योग सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम देईल. करिअरमध्ये नवे अवसर मिळू शकतात, मात्र काही अडथळेही येतील. नोकरी अथवा व्यवसायात प्रगतीसाठी धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. घरगुती जीवनात एखाद्या सदस्याशी किरकोळ मतभेद होऊ शकतात, मात्र संवाद साधून समस्या सोडवता येईल. आरोग्याच्या दृष्टीने हाडदुखी आणि सांधेदुखी त्रासदायक ठरू शकते. व्यायाम आणि संतुलित आहाराने परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत चढ-उतार येतील, त्यामुळे बचतीवर भर द्यावा.
advertisement
4/4
दरम्यान, एकंदरीत पाहता वृषभ, कन्या आणि मकर राशींना बुधाच्या या गोचरामुळे जीवनात थोडा अस्थिरतेचा काळ जाणवू शकतो. नात्यांमध्ये संयम, आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय आणि आरोग्याबाबत जागरूकता ठेवली तर परिस्थिती हळूहळू सुधारेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ज्याची भीती होती तेच घडणार! त्रिग्रही योगामुळे या राशींच्या लोकांच्या आरोग्यासह पैशांचं नुकसान होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल