मिळालेल्या माहितीनुसार, यंदा विसर्जन मिरवणुकीत 100 हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या. काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर पीडित भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आत्तापर्यंत 10 गुन्हे अधिकृतपणे दाखल झाले आहेत. त्यापैकी 4 मोबाईल पोलिसांनी परत मिळवले आहेत आणि 4 आरोपींना अटक केली आहे.
सोन्याच्या चेन चोरीचेही अनेक प्रकार
मोबाईल चोरीसोबतच सोन्याच्या चेन हिसकावण्याचेही प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सध्या 7 प्रकरणांची नोंद झाली असून, 2 सोन्याच्या चेन परत मिळाल्या आहेत आणि 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
advertisement
विसर्जन सोहळा 32-35 तासांचा
लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग येथून सुरू होऊन गिरगाव चौपाटीपर्यंत सुमारे 32 ते 35 तास चालली. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले होते, पण या गर्दीतच चोरट्यांनी हात साफ केला. मुंबई पोलिसांनी या घटनेत अधिक तपास सुरू केला असून, ड्रोन वापरासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.