अरे देवा! 7 सप्टेंबरचं चंद्रग्रहण 5 राशींवर घेऊन येणार संकट, कौटुंबिक वादासह मोठं आर्थिक नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Chandra Grahan 2025 : वैदिक पंचांगानुसार 7 सप्टेंबर 2025 हा दिवस खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे.
advertisement
1/6

मुंबई : वैदिक पंचांगानुसार 7 सप्टेंबर 2025 हा दिवस खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. भारतासह जगातील अनेक देशांतून हे ग्रहण पाहता येईल. या वेळी तयार होणाऱ्या ग्रहस्थितीला ज्योतिषशास्त्रात प्रतिकूल मानले जाते. विशेष म्हणजे या ग्रहणाचा परिणाम पाच राशींवर अधिक तीव्रतेने होणार असून त्यांना आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/6

वृषभ -  वृषभ राशीच्या लोकांसाठी या काळात आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च वाढतील आणि आर्थिक स्थितीवर ताण येईल. कामाच्या ठिकाणीही अडचणी निर्माण होतील, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढेल.
advertisement
3/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना मुलांबाबत चिंता निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण राहील. नोकरी किंवा व्यवसायात कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांचा नाराजीचा सामना करावा लागू शकतो. या काळात आत्मसंयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
4/6
सिंह -  सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण कौटुंबिक जीवनात आव्हान घेऊन येईल. जोडीदाराशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. भावंडांशी संबंध ताणले जातील. शांतता राखणे आणि संयमाने वागणे गरजेचे आहे.
advertisement
5/6
तूळ -  तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खर्चिक ठरेल. अनेक कामे एकाच वेळी करण्यामुळे गोंधळ निर्माण होईल. व्यावसायिकांनी विशेष काळजी घ्यावी, कारण जवळचे लोकसुद्धा फसवणूक करू शकतात. आपली योजना गुप्त ठेवणे आणि इतरांवर जास्त विश्वास न ठेवणे श्रेयस्कर ठरेल.
advertisement
6/6
कुंभ -  चंद्रग्रहण कुंभ राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांनी विशेष सतर्क राहावे. अपघाताची शक्यता आहे. शत्रू सक्रिय होतील आणि तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. करिअरमध्ये अडचणी येतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. बोलताना संयम बाळगणे आणि परिस्थितीकडे बारकाईने लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! 7 सप्टेंबरचं चंद्रग्रहण 5 राशींवर घेऊन येणार संकट, कौटुंबिक वादासह मोठं आर्थिक नुकसान होणार