एग्ज फ्रीज करून अभिनेत्री झाली प्रेग्नंट, आता होतोय पश्चाताप; म्हणाली, 'नॅचरल प्रेग्नंट होणं...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
3 वर्षांआधी अभिनेत्रीनं तिचे एग्ज फ्रीज केले. आता ती प्रेग्नंट झाली पण एग्ज फ्रीज करून अभिनेत्रीवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
advertisement
1/8

अभिनेत्री पत्रलेखा आणि तिचा नवरा राजकुमार राव पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत. जुलै महिन्यात त्यांनी प्रेग्नंसीची घोषणा केली. पत्रलेखा आणि राजकुमार आई -बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
2/8
दरम्यान एका मुलाखतीत बोलताना पत्रलेखाना एग्ज फ्रीज करण्याच्या प्रोसेस विषयी आणि तिला आलेले अनुभव शेअर केलेत.
advertisement
3/8
सोहा अली खानच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना पत्रलेखा म्हणाली, "मी माझे तीन वर्षांआधी माझे एग्ज फ्रीज केले होते आणि आता मी प्रेग्नंट आहे. मला वाटतं की नैसर्गिकरित्या प्रेग्नंट राहणं सोपं आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं नव्हतं की ते इतकं अवघड होणार आहे."
advertisement
4/8
पत्रलेखा पुढे म्हणाली, "ही प्रोसेस शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खूप थकवणारी होती. माझं एग फ्रीझिंग पूर्ण झालं तेव्हाही मला वाटणारं दुखणं कमी झालं नाही."
advertisement
5/8
"मी नेहमीच तरुण मुलींना सल्ला देईन की नॅचरली प्रेग्नंट व्हा. त्या प्रोसेसमधून जाण्यापेक्षा हे खूप सोपं आहे."
advertisement
6/8
पत्रलेखानं गुड न्यूज कशी कळली याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "सुरुवातीला मला कळलंच नाही की मी प्रेग्नंट आहे, कारण मी घरी केलेली टेस्ट निगेटिव्ह आली होती. डॉक्टरांशी बोलल्यानंतर समजलं की मी प्रेग्नंट आहे. त्यानंतर आम्ही तीन महिने ही गोष्ट खाजगी ठेवायचं ठरवलं."
advertisement
7/8
पत्रलेखानं अजून एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, "मी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एका ट्रॅव्हल शोसाठी करार केला होता. मार्चमध्ये आम्हाला कळलं की मी प्रेग्नंट आहे."
advertisement
8/8
"एप्रिलपर्यंत शो करावा लागला, आम्हाला करावंच लागलं कारण तो एक करार होता. पण तो अनुभव खूप भयानक होता."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एग्ज फ्रीज करून अभिनेत्री झाली प्रेग्नंट, आता होतोय पश्चाताप; म्हणाली, 'नॅचरल प्रेग्नंट होणं...'