खूप दु:ख सोसलं आता जीवनात आनंद येणार! २२ एप्रिलपासून शनिच्या उदयानंतर ३ राशींची चिंता कायमची मिटणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Uday 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जाते. शनीचा प्रभाव व्यक्तीला शिस्त, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवतो.
advertisement
1/6

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानले जाते. शनीचा प्रभाव व्यक्तीला शिस्त, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवतो. प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देणारा शनी सुमारे अडीच वर्ष एका राशीत राहतो आणि त्यानंतर पुढील राशीत प्रवेश करतो. सध्या शनी मीन राशीत भ्रमण करत असून, 22 एप्रिल 2026 रोजी त्याचा उदय होणार आहे. या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनिचा उदय अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदीसाठीही हा काळ अनुकूल ठरेल. कुटुंबात आनंद आणि शांततेचे वातावरण राहील.
advertisement
3/6
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचा उदय करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या काळात शनि कर्मभावात असल्याने नोकरीत प्रगती, पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरेल.
advertisement
4/6
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनिचा उदय अनुकूल परिणाम देणारा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना विस्ताराच्या नव्या संधी मिळू शकतात. तसेच, नवीन कौशल्ये शिकण्याची उत्सुकता वाढेल, ज्यामुळे भविष्यात अधिक प्रगती साधता येईल.
advertisement
5/6
एकूणच, शनिच्या उदयानंतर काही राशींना विशेषतः आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.
advertisement
6/6
<strong> (सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
खूप दु:ख सोसलं आता जीवनात आनंद येणार! २२ एप्रिलपासून शनिच्या उदयानंतर ३ राशींची चिंता कायमची मिटणार