TRENDING:

Aajache Rashibhavishya: छळणारं संकट टळेल, बुधवारी हवं ते मिळेल, मेष ते मीन राशीवाले या चुका टाळा, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा बुधवार मेष ते मीन राशींसाठी खास आहे. पुण्यातील ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
छळणारं संकट टळेल, बुधवारी हवं ते मिळेल, मेष ते मीन राशीवाले या चुका टाळा, आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मेष राशीसाठी चांगला योग तयार होत असून नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात एकाग्रता आणणे महत्त्वाचं आहे. तरच कामे मार्गी लागतील.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस कामामध्ये जाणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. अति कामामुळे तणाव जाणवू शकतो. आरोग्याच्या समस्या देखील जाणवतील. त्यामुळे कामाच्या धावपळीत स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नका. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत बिंदासपणे मागा.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानकारक असणार आहे. तुम्ही तुमचे काम अगदी हुशारीने पूर्ण करणार आहात. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परंतु स्थिर मनाने अडचणींचा विचार केला तर यावर मार्ग नक्की सापडेल. चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम खूप महत्त्वाचा आहे.
advertisement
5/13
सिंह राशीसाठी आजचा दिवस कधी खुशी कधी गम अशा पद्धतीचा असणार आहे. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. विरोधाला विरोध करत बसू नका त्याकडे दुर्लक्ष करा. विरोध कराल तर वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही कामाने उत्तर द्या. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य विचार करा आणि तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नका. शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे आज टाळा. कामावर लक्ष केंद्रित करा. मन शांत राहण्यासाठी स्वतःला आवडेल त्या गोष्टी करा.
advertisement
7/13
तूळ राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस कामामध्ये जाणार आहे. दिवसभर कामाची धावपळ असेल. अचानक नवीन जबाबदाऱ्या येतील. अनेक दिवसांपासून ज्या अडचणीचा सामना करत होता. त्या काहीशा कमी होतील. कुटुंबाला वेळ द्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. काही लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात. कामात अडथळे येऊ शकतात, पण शांत राहिलात तर सगळे व्यवस्थित होईल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाचे व्यवहार जपून करा.
advertisement
9/13
आज धनु राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. भाग्य तुमच्या बाजूने राहील. शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य ठरेल. नोकरीत चांगली संधी मिळू शकते. आर्थिक बाजू मजबूत राहील.
advertisement
10/13
मकर राशीचा आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन घ्या. आर्थिक बाजू ठीक असेल. परंतु खर्च करताना विचार करा योग्य ठिकाणीच खर्च करा.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. अडचणींवर मार्ग निघतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे चीज होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. खऱ्या अर्थाने आजचा दिवस मानसिक समाधान देणारा असेल. एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम आहे.
advertisement
12/13
आज मीन राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. मिळकतीचे मार्ग वाढतील. कुटुंबात वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. काही दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागू शकतात. कामाच्या ठिकाणीही चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: छळणारं संकट टळेल, बुधवारी हवं ते मिळेल, मेष ते मीन राशीवाले या चुका टाळा, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल