TRENDING:

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीवाले रविवारी तुमच्या नशिबी काय? संधी की संकट, इथं पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा रविवार काही राशींसाठी उत्तम असून काहींचं टेन्शन वाढवणारा आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं आजचं राशीभविष्य सांगितले आहे.
advertisement
1/13
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीवाले रविवारी तुमच्या नशिबी काय? संधी की संकट, इथं पाहा आजचं राशीभविष्य
मेष राशीसाठी आजचा दिवस आरामात जाणार आहे. सुट्टीचा आनंद पुरेपूर घेता येणार असून सकारात्मक बदल आजचा दिवस घेऊन येणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ अकराव्या स्थानात आहे. तर चंद्र मेष राशीच्या पहिल्या स्थानात असल्यामुळे चांगला प्रभाव तुमच्यावर असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवसांत अनेक छोट्यामोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. थोडेफार वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती शांततेने हाताळा. तुमच्या राशीपासून द्वादश स्थानात असलेला चंद्र काही अडथळे निर्माण करू शकतो.
advertisement
3/13
मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नवीन कामांना सुरुवात होणार असून नात्यांमधील गैरसमज दूर होण्याची दाट शक्यता आहे. एकूणच आजचा दिवस तुमचा आनंदाचा आणि समाधानकारक असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस रविवार असून देखील व्यस्त असणार आहे. आज कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या अधिक वाढू शकतात, त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
5/13
सिंह राशीच्या या आजचा दिवस आनंद आणि समाधान देणारा असणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि समाजात तुमचा मान - सन्मान वाढेल. जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या देखील दिवस चांगला जाईल.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम योग घेऊन येत आहे. दिवस आनंदात जाणार असला तरी आर्थिक गणित कोलमडणार आहे. चंद्राचा प्रभाव तुमच्यावर आहे. कामांच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/13
तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस कामात जाणार असून कामानिमित्त प्रवास देखील होऊ शकतो. अति कामामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःला सुद्धा वेळ द्या. आज तुम्हाला कामामध्ये कोणीतरी मदत नक्की करेल.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणारा आहे. चतुर्थ स्थानातील मंगळामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. भावनिक निर्णय घेण्यापासून दूर राहा. आज मन थोडं अस्थिर राहू शकतं. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार असून आज तुमच्याकडून धार्मिक कार्य घडेल. सप्तम स्थानातील गुरुमुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आहाराकडे जास्त लक्ष द्या.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामामध्ये तुम्ही प्रगती करणार आहात. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आहाराकडे जास्त लक्ष द्या. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी ग्रहस्थिती चांगली असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. नवीन संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. आज तुम्ही करत असलेल्या कामामध्ये यश मिळेल.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांचा आज अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता त्या पूर्ण न झाल्याने मन दुःखी होऊ शकतं. वैयक्तिक नात्यांमध्ये थोडा तणाव जाणवू शकतो. पण संयमाने वागलात तर परिस्थिती बदलू शकते. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. राशीसाठी द्वादश स्थानामुळे हा प्रभाव जाणवणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशीवाले रविवारी तुमच्या नशिबी काय? संधी की संकट, इथं पाहा आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल