CNG: किती दिवस छोट्या कारमध्ये फिरायचं? 28 किमी मायलेज अन् किंमत 6 लाखांपासून, टॉप 5 CNG SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
एवढंच नाहीतर एसयूव्हीमध्येही फिचर्स हे एकापेक्षा एक आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस जर तुम्ही फॅमिलीसाठी एक उंच आणि दमदार अशी एसयूव्ही विकत घेण्याचा प्लॅन करत असाल ५ अशा स्वस्तात मस्त अशा एसयूव्ही आहे
advertisement
1/11

भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे चांगलीच स्वस्ताई आली आहे. कारच्या किंमतीत आता एसयूव्ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एवढंच नाहीतर एसयूव्हीमध्येही फिचर्स हे एकापेक्षा एक आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस जर तुम्ही फॅमिलीसाठी एक उंच आणि दमदार अशी एसयूव्ही विकत घेण्याचा प्लॅन करत असाल ५ अशा स्वस्तात मस्त अशा एसयूव्ही आहे, ज्या सहज दारात उभ्या करता येतील.
advertisement
2/11
पहिल्या नंबरवर येते भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची फ्रँक्स Maruti Suzuki Fronx iCNG. मारुतीच्या गाड्या नेहमी भारतीयांच्या फेव्हरेट राहिल्या आहेत. Maruti Suzuki Fronx ही एक काळाच्या पुढे आलेली मिडसाईज एसयूव्ही आहे.
advertisement
3/11
या Maruti Suzuki Fronx मध्ये १.२ लिटरचं इंजिन दिलं आहे. पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. Maruti Suzuki Fronx सीएनजीमध्ये तब्बल २८.५१ किमी मायलेज देते. या Maruti Suzuki Fronx ची किंमत ७.७९ लाखांपासून सुरू होते.
advertisement
4/11
Hyundai Exter Hy-CNG Duo - दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने आता भारतात स्वस्तात मस्त अशी मिडसाईज एसयूव्ही आहे. Hyundai Exter Hy-CNG Duo यामध्ये 'ट्विन सिलेंडर' टेक्नॉलाजी वापरली आहे. ज्यामुळे सीएनजी टँक असूनही डिकीमध्ये बूट स्पेस चांगला आहे.
advertisement
5/11
सिलेंडर हे डिकीच्या खाली लावले आहे. या Hyundai Exter Hy-CNG Duo चंं मायलेज २७.१ किमी इतकं आहे. आताच नवीन व्हेरिएंट Hyundai ने लाँच केलं आहे. सीएनजी व्हेरियंटची किंमत ६.९९ लाखांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स स्टँडर्ड आणि डॅशकॅम सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
6/11
भारतातीयांचा विश्वास असलेली टाटा मोटर्सची टाटा पंच ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेफ्ट आणि टँकसारखी मजबूत अशा टाटा मोटर्सच्या गाड्या आहे. त्यात टाटा पंच ही ५ स्टार सेफ्टी कार आहे. Tata Punch iCNG 2026 फेसलिफ्ट अलीकडे लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. Tata Punch iCNG चं मायलेज हे २६.९९ किमी इतकं आहे. या Tata Punch iCNG ची किंमत ७.६४ लाखांपासून सुरू होते.
advertisement
7/11
Maruti Suzuki Brezza CNG - मारुती सुझुकीची Maruti Suzuki Brezza CNG ही एक वेगळी आणि दमदार, शानदार लूक असणारी एसयूव्ही आहे. ही एक मारुतीची पॉवरफुल अशी एसयूव्ही आहे कारण यामध्ये १.५ लिटर इतकं मोठं इंजिन दिलं आहे. ज्यामुळे क्रेटा सारख्या एसयूव्हीला थेट टक्क देते.
advertisement
8/11
Maruti Suzuki Brezza CNG ची मायलेज हे २५.५१ किमी इतकं आहे. Maruti Suzuki Brezza CNG ची किंमत 10.18 लाखांपासून सुरू होते.
advertisement
9/11
पाचव्या क्रमांकावर सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी जपानी मोटर्सची निसान मॅग्नाइट Nissan Magnite CNG चा नंबर लागतो. अलीकडेच Nissan Magnite CNG ची लाँच झाली आहे. ही भारतातील सगळ्यात स्वस्त अशा एसयूव्हीपैकी एक आहे.
advertisement
10/11
Nissan Magnite ही सेफ्टीच्या बाबतीतही पुढे आहे. Nissan Magnite ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
advertisement
11/11
या Nissan Magnite CNG किंमत ही ७ लाखांपासून सुरू होते. Nissan Magnite CNG मध्ये १ लिटरचं इंजिन दिलं आहे. मायलेजचा विचार केला तर तब्बल २४ किमी इतकं मायलेज देते. विशेष म्हणजे, ही एक टाटा मोटर्सच्या गााड्यासारखी ५ स्टार सेफ्टी रेटिंग असणार एसयूव्ही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
CNG: किती दिवस छोट्या कारमध्ये फिरायचं? 28 किमी मायलेज अन् किंमत 6 लाखांपासून, टॉप 5 CNG SUV