TRENDING:

Aajache Rashibhavishya: ग्रह फिरले! मेष ते मीन राशीवाले आता चुका नको, शनिवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: शनिवारी ग्रह फिरणार असून मेष ते मीन राशींच्या जीवनावर काय परिणाम होईल? याबाबत ज्योतिषी अशोक पाटील यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे
advertisement
1/13
Aajache Rashibhavishya: ग्रह फिरले! मेष ते मीन राशीवाले आता चुका नको, शनिवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ग्रहमानाचा बदलामुळे उत्तम जाणार आहे. आजच्या दिवसांत अनेक अनुकूल बदल तुम्हाला पहायला मिळतील. शनिदेव उत्तरभाद्रपदा नक्षत्रातील तिसऱ्या स्थानात प्रवेश करत आहे. या प्रभावामुळे अनेक समस्या मिटतील.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवसांत महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. तडकाफडकी निर्णय घेतला तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कामाचे नियोजन लावा. स्मार्टवर्क करण्याकडे लक्ष द्या.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगले योग घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण होतील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. प्रत्येक कामात आज नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. नवीन काही सुरुवात करण्याची असल्यास आजचा दिवस उत्तम आहे. शनीच्या प्रभावामुळे हे चांगले बदल होणार आहेत.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस ठीक जाणार आहे. महत्त्वाची कामे आजच्या दिवसांत पूर्ण होतील. परंतु कामाच्या व्यापात कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.
advertisement
5/13
आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ चाखायला मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्य चांगले राहील. शनिचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे.
advertisement
6/13
कन्या राशीच्या व्यक्तींना आज जास्त मेहनत करावी लागणार आहे. अतिकामामुळे ताण वाढू शकतो, पण तुम्ही तो योग्यरीत्या हाताळाल. कामामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे.
advertisement
7/13
तूळ राशीसाठी आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कामाच्या धावपळीत कुटुंबाला वेळ द्यायचं विसरू नका. वेळ न दिल्यामुळे वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. वृश्चिक राशीसाठी पंचम स्थानात शनि आणि चतुर्थ स्थानात केतू असल्यामुळे कभी खुशी तो कभी गम अशा घटना दिवसभरात पाहायला मिळतील. कामामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्ही फोकसने काम केलं तर यावर नक्कीच मात कराल.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. शनीचा चांगला प्रभाव तुमच्यावर असणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजच्या दिवसांत कामात अडथळे येऊ शकतात, परंतु यावर तुम्ही नक्कीच मात कराल. कुटुंबाचा पाठिंबा मिळणारं आहे. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या राशीपासून तृतीय स्थानात मीन राशीत शनीचा संचार आहे. ही स्थिती म्हणजे जीवनात तुम्ही बदलाच्या एका नवीन टप्प्यावर उभे असल्याचं दर्शवते.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा भावनिक असणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाची निर्णय घेताना हजार वेळा विचार करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे दुखवले जाऊ शकता. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आज चंद्र मेष राशीत असून तो तुमच्या राशीपासून पंचम स्थानात आहे. त्यामुळे काही अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला थोडं वाईट वाटू शकतं किंवा निराशा येऊ शकते. त्यामुळे आज कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जवळच्या नात्यांमध्ये थोडे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना जपून बोला. 
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: ग्रह फिरले! मेष ते मीन राशीवाले आता चुका नको, शनिवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल