TRENDING:

Weather Alert: वादळी पाऊस, गारपीट अन् पुन्हा 'तो' अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 48 तास महत्त्वाचे!

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी संकट कायम आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: वादळी पाऊस, गारपीट अन् पुन्हा 'तो' अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 48 तास महत्त्वाचे!
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्च महिन्यात उन्हाळा आणि उष्णता असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा प्रभाव दिसत आहे. सध्या वेस्टर्न डिस्टरबन्स आणि चक्रीवादळी प्रणालीमुळे हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विजांचा कडकडाट, गारपीट आणि सोसाट्याचा वारा यांसह तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, 21 मार्चपासून तीव्रता कमी होणार असून पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांत वारं फिरलं आहे. पावसानं माघार घेतली असून आज हवामान कोरडे राहील. आता उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून रविवारपासून 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तापमान 30-34 अंशांपर्यंत राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, आणि अहमदनगर जिल्ह्यांत हवामानात बदल झाले असून अवकाळी संकट टळलं आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32-36 अंशांपर्यंत राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांतून अवकाळी संकट काही प्रमाणात टळलं आहे. आता उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आज हवामान कोरडे आणि काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहील. कमाल तापमान 34-38 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात वादळी पावसाचा धोका कायम आहे. छत्रपती संभाजीनगरसहस जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणीत हवामान कोरडे राहील. तर लातूर आणि धाराशिववर आज देखील अस्मानी संकट घोंघावत आहे. पुढील 24 तासांसाठी या जिल्ह्यांना पाऊस, वादळ आणि गारपीटचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तापमान 34-37 अंशांपर्यंत राहील.
advertisement
6/7
विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका कायम आहे. आज देखील ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 39 अंशांपर्यंत जाईल. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, 21 मार्चपासून 24 मार्चपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि आणि मराठवाड्यात सर्वाधिक प्रभाव राहील. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. गारपीट आणि वादळाचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वादळी पाऊस, गारपीट अन् पुन्हा 'तो' अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 48 तास महत्त्वाचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल