TRENDING:

Surya Gochar: तयारीत राहा! 15 मार्चच्या आधीच मिळणार गुडन्यूज; सूर्य कुंभ राशीत आल्याने 4 राशींना लॉटरी

Last Updated:
Horoscope Marathi: ग्रहांचे गोचर ठराविक काळाने होत राहते, याचा राशीचक्रावर परिणाम दिसतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मबल, प्रतिष्ठा, नेतृत्व क्षमता आणि वडिलांसोबतच्या संबंधांचा कारक मानला जातो. कुंडलीतील सूर्याची स्थिती व्यक्तीचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता आणि सामाजिक मानसन्मान दर्शवते. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्याचे राशी परिवर्तन झाले असून हे गोचर अनेक राशींसाठी दिलासा आणि प्रगतीचे संकेत देत आहे.
advertisement
1/4
तयारीत राहा! 15 मार्चच्या आधीच गुडन्यूज; सूर्य कुंभ राशीत आल्याने 4 राशींना लाभ
मेष - सूर्याचे गोचर मेष राशीच्या कुंडलीतील अकराव्या भावात झाले असून ते उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नवीन संपर्कांमुळे मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग तयार होऊ शकतात.
advertisement
2/4
मिथुन - मिथुन राशीच्या नवव्या भावात सूर्याचा प्रवेश झाल्याने तुमचे नशीब पालटेल. 15 मार्च 2026 पूर्वी तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नात्यातील गैरसमज दूर होतील आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो.
advertisement
3/4
सिंह - सूर्याचे गोचर सिंह राशीच्या सातव्या भावात झाले आहे, ज्यामुळे भागीदारी आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभाचे संकेत आहेत. जीवनसाथीची साथ मिळेल, ज्यामुळे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल.
advertisement
4/4
तूळ - तूळ राशीच्या पाचव्या भावात सूर्याचे हे गोचर सर्जनशीलता आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये लाभ देऊ शकते. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Gochar: तयारीत राहा! 15 मार्चच्या आधीच मिळणार गुडन्यूज; सूर्य कुंभ राशीत आल्याने 4 राशींना लॉटरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल