TRENDING:

Ganesh Chaturthi Ganpati Dream : स्वप्नात गणपती दिसण्याचा अर्थ, बाप्पांना तुम्हाला काय सांगायचंय?

Last Updated:
स्वप्नात देव पाहणं शुभ मानलं जातं. म्हणजे देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.  भगवान गणेशाला सुख, समृद्धी आणि बुद्धीची देवता मानलं जातं. शास्त्रानुसार स्वप्नात गणपतीचं दर्शन होणं सामान्य बाब नाही. 
advertisement
1/9
स्वप्नात गणपती दिसण्याचा अर्थ, बाप्पांना तुम्हाला काय सांगायचंय?
सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मंडळं आणि घरोघरीही गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळेजण गणपतीच्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहणार आहे. काहींना तर अगदी स्वप्नातही गणपती बाप्पा दिसले असतील. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ असतो. गणपती बाप्पा स्वप्नात दिसण्याचाही खास अर्थ आहे.
advertisement
2/9
जर तुम्हाला गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत स्वप्नात गणपती दिसला किंवा तुम्ही स्वतःला गणपतीची पूजा करताना पाहिलं तर हे खूप शुभ स्वप्न मानलं जातं. तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
advertisement
3/9
सकाळी जर तुम्हाला गणपतीचं स्वप्न पडलं तर ते अधिक शुभ असतं. याचा अर्थ बाप्पा तुमची एक इच्छा पूर्ण करणार आहे.
advertisement
4/9
तुम्हाला स्वप्नात गणपतीची मूर्ती दिसली तर याचा अर्थ तुमच्या घरी एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो किंवा बराच काळ प्रलंबित, रखडलेलं काम लवकरच पूर्ण होऊ शकतंय.
advertisement
5/9
स्वप्नात गणपतीसोबत गणेशाचं वाहन म्हणजे उंदीर दिसला तर हे देखील एक शुभ आहे. हे कामात यश किंवा संपत्ती मिळवण्याचं संकेत मानलं जातं.
advertisement
6/9
गणपतीचं स्वप्न शुभ असतं. पण जर तुम्हाला स्वप्नात गणपतीचं विसर्जन दिसलं तर ते शुभ मानलं जात नाही. स्वप्नशास्त्रानुसार ते जीवनातील दुःख, त्रास किंवा आर्थिक संकटाचं लक्षण मानलं जातं.
advertisement
7/9
शास्त्रानुसार स्वप्न किती शुभ आणि फलदायी आहे, हे स्वप्नाच्या वेळेवरही अवलंबून असतं. दुपारी झोपलेले असताना दिसणाऱ्या स्वप्नांचा लाभ मिळत नाही. तर रात्री 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान स्वप्ने पाहणं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर ब्रह्म मुहूर्तावर गणेशजींचे स्वप्न पाहणं खूप शुभ मानलं जातं. त्याचं फळही लवकर मिळतं.
advertisement
8/9
शास्त्रात सांगितलं आहे की, स्वप्न कोणाशीही शेअर करू नये. असं केल्याने त्याचं फळ मिळत नाही. स्वप्नात श्रीगणेश दिसले तर त्याविषयी कोणालाही सांगू नये, असे केल्याने त्याचे शुभ परिणाम नष्ट होतात, असं मानलं जातं.
advertisement
9/9
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिली आहे. (सर्व फोटो : AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ganesh Chaturthi Ganpati Dream : स्वप्नात गणपती दिसण्याचा अर्थ, बाप्पांना तुम्हाला काय सांगायचंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल