Cruise Trip : व्हॅलेन्टाईन्सला फिरण्याचा प्लॅन आहे? 'हे' लग्झरी क्रूझ तुमचा अनुभव बनवतील आणखी सुंदर..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Best Cruise For Valentine's Day Trip : व्हॅलेन्टाईन्स डे साठी आता सर्वांचे प्लॅनिंग सुरु झाले आहे. वेगवेगळ्या गिफ्ट्स आयडिया, डेट साठी आयडिया आणि एकूणच आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी लोक या काळात खूप प्रयत्न करतात. तुमच्या या परिस्थितीत तुमची थोडीधी मदत करण्यासाठी हा लेख आहे. आज आम्ही तुम्हाला काही लग्झरी क्रूझ विषयी सांगणार आहोत. व्हॅलेन्टाईन्स डेसाठी तुम्ही यांचा विचार करू शकता.
advertisement
1/7

व्हॅलेन्टाईन्स डेला फुलं, चॉकलेट आणि भेटवस्तू तर सगळेच देतात. मात्र तुम्ही काहीतरी वेगळे ट्राय करू शकता. तुमचे बजेट थोडे जास्त असेल आणि एखादा लग्झरी अनुभव घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही क्रूझ डेट ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला मुंबईहून निघणाऱ्या काही क्रुझविषयी माहित देत आहोत.
advertisement
2/7
भारत हा केवळ पर्वत, वाळवंट आणि जंगलांचा देश नाही तर नद्या आणि किनारपट्टीच्या विशाल जाळ्यामुळे तो क्रूझ पर्यटनासाठीही उत्तम आहे. तुम्ही लक्झरी, संस्कृती, निसर्ग किंवा थोडेसे साहस शोधत असलात तरी, भारत विविध प्रकारचे क्रूझ अनुभव देतो, जे आराम आणि निसर्गरम्य सौंदर्याचे मिश्रण आहेत.
advertisement
3/7
कॉर्डेलिया क्रूझ : हे क्रूझ म्हणजेच जहाज मुंबई ते गोवा / लक्षद्वीप या ठिकाणी प्रवास करते. कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर तुम्हाला पार्ट्या, संगीत कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि उत्कृष्ट जेवणाचा आनंद घेता येतो. व्हॅलेन्टाईन्स डेला तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे क्रूझ उत्तम पर्याय आहे.
advertisement
4/7
जलेश क्रूझ : हे क्रूझ मुंबईहून निघते आणि गोवा, दीव आणि कोची या सर्व ठिकाणी जाते. तुम्हाला अगदी शांत पण एकदम लग्झरी अनुभव हवा असेल तर जलेश क्रूझ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. मात्र या क्रूझचा कालावधी थोडा जास्त आहे.
advertisement
5/7
गंगा नदी क्रूझ : हे क्रूझ मुंबईवरून नाही तर वाराणसीहुन सुरु हते आणि कोलकाताला जाते. भारतातील सर्वात प्रतिष्ठित नदीवरील हे क्रूझ सांस्कृतिक प्रवासाचा अनुभव देते. तुमच्या प्रवासादरम्यान तुम्ही मंदिरे, घाट आणि प्राचीन संस्कृतींना भेट देऊ शकता.
advertisement
6/7
स्टॅच्यू ऑफ युनिटी रिव्हर क्रूझ : जगातील सर्वात उंच पुतळ्याजवळील एक छोटासा पण निसर्गरम्य रिव्हर क्रूझ, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन पॅकेजेस उपलब्ध आहेत. व्हॅलेन्टाईन्स डेच्या संध्याकाळी तुम्ही या क्रुझचादेखील अनुभव घेऊ शकता.
advertisement
7/7
गोवा क्रूझ : गोव्याला गेल्या तुम्ही तेथील मांडवी नदीवरील सनसेट क्रूझचाही अनुभव घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला गोव्याचे संगीत, नृत्य आणि पाण्यावरून राजधानीचे दृश्ये दाखवणारा एक उत्साही संध्याकाळचा अनुभव मिळेल. सर्व क्रुझची अचूक माहिती तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cruise Trip : व्हॅलेन्टाईन्सला फिरण्याचा प्लॅन आहे? 'हे' लग्झरी क्रूझ तुमचा अनुभव बनवतील आणखी सुंदर..