Jupiter Transit Impact: 12 वर्षांनी गुरुदेव येणार वृषभ राशीत! या राशींना अपार धनलाभाचे योग, पालटणार नशीब!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Jupiter Transit Positive Impact: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असते. नऊ ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा लोकांवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रात बृहस्पतिला (गुरू ग्रह) देवगुरु म्हणतात. बृहस्पति हा धन, भाग्य, विवाह आणि धर्म याचा कारक ग्रह मानला जातो. गुरू 1 मे 2024 रोजी 12 वर्षांनंतर वृषभ राशीत संक्रमण करेल.
advertisement
1/6

गुरूला एका राशीत परत येण्यासाठी 12 वर्षे लागतात. वृषभ राशीतील गुरुचा प्रवेश तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जातो. त्या राशींविषयी जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून..
advertisement
2/6
मेष - ज्या लोकांची राशी मेष आहे, त्यांच्यासाठी गुरूचे हे संक्रमण खूपच लाभदायी ठरणार आहे. सध्या बृहस्पति मेष राशीत आहे, जो येथून पुढे सरकून वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्याचा सकारात्मक परिणाम प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल.
advertisement
3/6
या काळात मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश, नोकरीत प्रगती आणि आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला कामाची चांगली बातमी देखील मिळू शकते.
advertisement
4/6
वृषभ - वृषभ राशीत गुरूच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. या कालावधीत, तुमच्याकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असतील. ऑफिसमध्ये तुमचा मोठ्या प्रमाणावर सन्मान होईल. धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल.
advertisement
5/6
कर्क - ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाच्या राशीतील बदल कर्क राशीच्या लोकांसाठी नशीब पालटणारा मानला जातो. या काळात कर्क राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
advertisement
6/6
कर्क - तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. पगार वाढण्याची शक्यता आहे, कुटुंबियांसाठी चांगला वेळ घालवणं तुम्हाला आनंद देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Jupiter Transit Impact: 12 वर्षांनी गुरुदेव येणार वृषभ राशीत! या राशींना अपार धनलाभाचे योग, पालटणार नशीब!