TRENDING:

Astrology: आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, मार्गात अनेक संकटे

Last Updated:
Astrology: वर्ष २०२५ मधील सहा महिन्यांचा काळ संपला आहे. आता उर्वरित ६ महिन्यांत होणारे ग्रहांचे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत त्रासदायक मानले जात आहे. येणारा काळ काही राशींसाठी कठीण असू शकतो.
advertisement
1/7
आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, संकटे
२०२५ या वर्षाच्या शेवटच्या ६ महिन्यांत शनि संक्रमण, गुरू संक्रमण आणि राहू-केतू संक्रमण होणार आहे. त्याशिवाय वेळोवेळी शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. उर्वरित ६ महिन्यांतही ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत.
advertisement
2/7
शनी वक्री आणि गुरूचा उदय - ग्रह संक्रमण आणि बदलांची मालिका जुलैपासूनच सुरू होत आहे. १३ जुलैपासून शनि वक्री होईल आणि २८ नोव्हेंबरपर्यंत वक्री स्थितीत राहील. दरम्यान, बुध, मंगळ इत्यादी ग्रह देखील वक्री होतील. अस्ताचा गुरू लवकरच उदय करेल. ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत होणारे हे बदल ५ राशींवर नकारात्मक परिणाम करू शकतात. जाणून घेऊया यावरून २०२५ या वर्षाचा उर्वरित काळ कोणासाठी कठीण ठरू शकतो.
advertisement
3/7
मेष - शनी सध्या मीन राशीत आहे, त्यामुळे मेष राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. साडेसातीमुळे अनेक प्रकारचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावे लागणार आहेत. या वर्षी मेष राशीच्या लोकांना अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.
advertisement
4/7
वृश्चिक - वृश्चिक राशीचे लोक स्वतःचे नुकसान आपल्या हातानेच करू शकतात. राग, कडवट बोलणं, वाद टाळावे लागतील. अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक जीवनात तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पैसा मिळणार नाही. खर्च जास्त असेल.
advertisement
5/7
सिंह - सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या अडीचकीचा परिणाम होईल, ज्यामुळे आपल्या आयुष्यात चढ-उतार येतील. उत्पन्नात घट होऊ शकते. पैसा कुठेतरी अडकू शकतो. अपघात किंवा काही आजार होऊ शकतात.
advertisement
6/7
धनु - धनु राशीच्या मागे शनीची अडीचकी हात धुवून लागू शकते. यासोबतच, शनीची वक्री चालही कहर करेल. २०२५ च्या उर्वरित महिन्यांत पैशाचे नुकसान, मानहानी, आरोग्य समस्या होण्याची शक्यता होईल. काळजी घ्यावीच लागेल.
advertisement
7/7
मीन - मीन राशीचे लोक या वर्षी खूप त्रासातून दिवस काढतील. शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक आहे आणि त्याचा परिणाम मीन राशीवर दिसून येईल. हा काळ अडचणीत जाईल. आर्थिक संकट येऊ शकते. आजार तुम्हाला त्रस्त करतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, मार्गात अनेक संकटे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल