पीडित महिलेच्या एफआयआरनुसार, ती सुलेमान कादिरच्या घरी घरकाम करत होती. कामाच्या निमित्ताने सुलेमानने तिला जबरदस्तीने आपल्या फार्महाऊसवर नेलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तिने केला आहे. तक्रार नोंदवल्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून, अहवालानंतर अत्याचाराची अधिकृत पुष्टी होईल, असं पोलिसांनी सांगितलं.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, कायद्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे आणि पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून असेल.
advertisement
कोण आहे सुलमान कादिर?
41 वर्षीय सुलेमान कादिरने 2005 ते 2013 या काळात पाकिस्तानमध्ये 26 फर्स्ट क्लास आणि 40 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. तो अब्दुल कादिर यांच्या चार मुलांपैकी एक आहे.
अब्दुल कादिर यांना पाकिस्तान क्रिकेटचा लेगस्पिन जादूगार म्हटले जाते. सुलेमानचे वडील अब्दुल कादिर हे पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज नाव असून त्यांनी देशाकडून 67 कसोटी, 104 एकदिवसीय सामने खेळले होते.
लेगस्पिनला नवी ओळख मिळवून देणारा गोलंदाज
अब्दुल कादिर यांचं सप्टेंबर 2019 मध्ये निधन झालं होतं. त्यांच्या कारकिर्दीमुळे पाकिस्तान क्रिकेटला जागतिक ओळख मिळाली होती. मात्र आता त्यांच्या मुलावर लागलेल्या आरोपांमुळे कुटुंबाचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
सचिन तेंडुलकर आणि अब्दुल कादिर यांचा तो ऐतिहासिक किस्सा
अब्दुल कादिर यांचे नाव निघाल्यावर क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर विरुद्धचा तो थरार आठवतोच. 16 वर्षांचा सचिन तेंडुलकर फलंदाजी करत असताना, त्याने पाकिस्तानचा फिरकीपटू मुश्ताक अहमद याच्या एका षटकात दोन षटकार ठोकले होते. हे पाहून अनुभवी अब्दुल कादिर सचिनजवळ गेले आणि त्याला आव्हान देत म्हणाले, "लहान मुलांना काय मारतोयस? हिंमत असेल तर मला मारून दाखव." (बच्चों को क्यों मार रहे हो? हमें मार के दिखाओ!)
त्यावेळी सचिन काहीच बोलला नाही, पण त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. अब्दुल कादिर यांच्या पुढच्या षटकात सचिनने तब्बल २८ धावा कुटल्या. सचिनने 6, 0, 4, 6, 6, 6 अशा धावा केल्या होत्या.
त्या षटकानंतर अब्दुल कादिर यांनी स्वतः सचिनचे टाळ्या वाजवून कौतुक केले आणि नंतर एका मुलाखतीत सांगितले, तो खरोखरच भविष्यातील स्टार आहे.
