TRENDING:

आज चंद्रग्रहण! सुतक काळ असणार,'ही' वेळ न चुकता काटेकोरपणे पाळायचीच, धार्मिक नियम काय?

Last Updated:
Chandra Grahan 2025 : यंदा वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार असल्याने खगोलप्रेमी आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस विशेष ठरणार आहे.
advertisement
1/5
आज चंद्रग्रहण! सुतक काळ असणार,'ही' वेळ न चुकता काटेकोरपणे पाळायचीच
यंदा वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार असल्याने खगोलप्रेमी आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस विशेष ठरणार आहे. एकूण साडेतीन तासांचे हे चंद्रग्रहण रात्री घडेल. त्यापूर्वी सुतक काळ सुरू होणार असून शास्त्रानुसार या काळात काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
advertisement
2/5
आज चंद्रग्रहण! सुतक काळ असणार,'ही' वेळ न चुकता काटेकोरपणे पाळायचीच
चंद्रग्रहणाचा कालावधी वैदिक पंचांगानुसार, हे पूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल. ग्रहणाची सर्वात महत्वाची अवस्था म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11:01 वाजता सुरू होऊन 12:23 वाजेपर्यंत चालेल. या टप्प्याचा कालावधी अंदाजे 1 तास 22 मिनिटे असेल. संपूर्ण ग्रहणाचा कालावधी 3 तास 30 मिनिटे राहणार आहे.
advertisement
3/5
<strong>सुतक काळ कधी सुरू होईल?  </strong>ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणापूर्वी 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. त्यामुळे 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुतक कालावधी सुरू होईल. या वेळेपासून मंदिरांचे दरवाजे बंद होतात आणि धार्मिक कार्यांवर बंधने येतात. ग्रहण संपल्यानंतर घर, मंदिराची स्वच्छता केली जाते आणि देवतांची पुनर्पूजा केली जाते.
advertisement
4/5
<strong>सुतक काळाचे धार्मिक नियम - </strong> सुतक काळात देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे किंवा पूजा करणे टाळावे. गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर जाणे टाळावे, कारण शास्त्रानुसार त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. केस आणि नखे कापणे, तसेच कोणतेही शुभकार्य करणे अशुभ मानले जाते. ग्रहण सुरू झाल्यावर अन्नपदार्थ खाणे-पिणे निषिद्ध आहे. यावेळी आधीच तयार केलेल्या अन्नात तुळशीची पाने किंवा दुर्वा टाकावी, जेणेकरून ते शुद्ध राहील. सुतक काळात भक्तांनी देवाचे मंत्रजप आणि स्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
advertisement
5/5
ग्रहणाचे महत्त्व भारतीय परंपरेत चंद्रग्रहण केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीनेही महत्त्व दिले जाते. धर्मशास्त्र सांगते की ग्रहणकाळात आत्मचिंतन, मंत्रजप, ध्यान आणि दानधर्म केल्यास पुण्य प्राप्त होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज चंद्रग्रहण! सुतक काळ असणार,'ही' वेळ न चुकता काटेकोरपणे पाळायचीच, धार्मिक नियम काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल