TRENDING:

लग्नासाठी बदलला धर्म, नवऱ्यानेच गोळ्या झाडून केली हत्या, अभिनेत्रीचा भयानक अंत पाहून उडेल थरकाप

Last Updated:
Bollywood Actress Tragic Story : यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्रीने लग्नासाठी आपलं नाव आणि धर्म बदलला, पण तिच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. एका क्षणात तिचं घर उद्ध्वस्त झालं.
advertisement
1/10
लग्नासाठी बदलला धर्म, नवऱ्यानेच गोळ्या झाडून केली हत्या, अभिनेत्रीचा भयानक अंत
मुंबई: बाहेरून आकर्षक असणाऱ्या मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या आयुष्यात दुःखद आणि भयानक सत्य लपलेलं असतं. अशीच एक कहाणी आहे एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री सईदा खानची.
advertisement
2/10
लग्नासाठी बदलला धर्म, नवऱ्यानेच गोळ्या झाडून केली हत्या, अभिनेत्रीचा भयानक अंत
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सईदा खानने लग्नासाठी आपलं नाव आणि धर्म बदलला, पण तिच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. एका क्षणात तिचं हसणारं घर उद्ध्वस्त झालं.
advertisement
3/10
सईदा खानचा जन्म कोलकातामध्ये झाला. लहानपणापासूनच तिला संघर्ष करावा लागला. तिची आई नर्तिका असल्यामुळे घर कसं तरी चालायचं. त्यामुळे सईदाने वयाच्या ११ व्या वर्षीच काम करायला सुरुवात केली.
advertisement
4/10
एका फिल्मी पार्टीत दिग्दर्शक एच. एस. रावैल यांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला १९६१ मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात मनोज कुमारसोबत मुख्य भूमिका दिली. त्यानंतर ती किशोर कुमारसोबतही 'अपना हाथ जगन्नाथ'मध्ये दिसली.
advertisement
5/10
पण, हे यश फार काळ टिकलं नाही आणि हळूहळू तिला काम मिळणं कमी झालं. अशाच एका काळात तिची ओळख प्रसिद्ध निर्माता बृज सदानाशी झाली.
advertisement
6/10
बृज सदानाने सईदाला लग्नासाठी विचारलं आणि तिनेही लगेच होकार दिला. लग्नासाठी तिने स्वतःचा धर्म बदलला आणि आपलं नाव सुधा सदाना ठेवलं. त्यांना कमल आणि नम्रता अशी दोन मुलं झाली.
advertisement
7/10
पण, बृज सदानाच्या मनात कायम एक शंका होती की, लग्नाआधी सईदाला एक मूल होतं, जे तिची आई वाढवत होती. या संशयाने त्यांना सतत त्रास दिला.
advertisement
8/10
एके दिवशी मुलगा कमलच्या २० व्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक बृज सदानाने पत्नी सुधा, मुलगी नम्रता आणि मुलगा कमल यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून फक्त कमल जिवंत वाचला.
advertisement
9/10
या घटनेबद्दल सिद्धार्थ कन्ननशी बोलताना कमल म्हणाला होता, “माझी आई आणि बहीण रक्ताच्या थारोळ्यात होत्या. मी त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मलाही गोळी लागली आहे.”
advertisement
10/10
या दुःखद घटनेनंतर काही वर्षांनी कमल सदानाने काजोलसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण, काही चित्रपटांनंतर त्यानेही ही इंडस्ट्री सोडून दिली. सईदा खानचं आयुष्य हे एका झगमगणाऱ्या ग्लॅमरमागचं एक दुःखद सत्य होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नासाठी बदलला धर्म, नवऱ्यानेच गोळ्या झाडून केली हत्या, अभिनेत्रीचा भयानक अंत पाहून उडेल थरकाप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल