TRENDING:

खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time

Last Updated:
आमच्या वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहासोबत युती करतात. याचा 12 राशींवर प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली. (दुर्गेश सिंग राजपूत/प्रतिनिधी, नर्मदापुरम)
advertisement
1/6
खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकां...
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, खूप मोठ्या कालावधीनंतर आता गुरू ग्रहाने वृषभ राशीत परिवर्तन केले आहे आणि जून महिन्यात मंगळ ग्रहसुद्धा वृषभ राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे या दोन ग्रहांची युती तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होणार आहे.
advertisement
2/6
नवीन नोकरीच्या योगासोबतच संपत्तीमध्येही वाढ होणार आहे. या लोकांना धनलाभ होण्याचाही योग तयार होत आहे. तर मग नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार हे जाणून घेऊयात.
advertisement
3/6
वृषभ राशी : या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाची युती लाभदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या लोकांच्या कुंडलीत ही युती तयार होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. यामुळे त्यांना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. सोबतच जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल. विवाहित व्यक्तीसाठी वैवाहिक जीवन चांगले असेल. यावेळी यांच्या मान सन्मानात वाढ होईल. त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. तसेच व्यवसायाशी संबंधित धनलाभ होईल.
advertisement
4/6
सिंह राशि : या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाची युती सिद्ध होईल. कारण राशी कर्म भावात ही युती तयार होत आहे. यामुळे या राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याचा योग आहे. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यात त्यांना खूप यश मिळेल. तसेच मान सन्मानही वाढेल. या राशीच्या लोकांचे आपल्या वडिलांसोबत संबंध मजबूत होतील. यामुळे त्यांना पूर्वजांची संपत्तीही मिळू शकते.
advertisement
5/6
कर्क राशी : या राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. पैशांची बचत केल्याने त्यांना लाभ होईल आणि व्यवसायातही फायदा होईल. यावेळी गुंतवणूक केल्याने फायदा होईल. याशिवाय प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. कुटुंबासह सामंजस्याची भावना तयार होईल. संततीशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते.
advertisement
6/6
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल