Success Story : मत्स्यपालन व्यवसाय भारी, कमाई होते दुप्पट, पाटलांचा सक्सेस फॅार्म्युला!
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उझेब इक्बाल पाटील यानेही असाच एक प्रयोग केला आहे. त्याने वेगळी वाट निवडत मत्स्यपालन व्यवसायात यश मिळवले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
advertisement
1/7

उच्चशिक्षण घेऊन अनेक तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील 29 वर्षीय उझेब इक्बाल पाटील यानेही असाच एक प्रयोग केला आहे. त्याने वेगळी वाट निवडत मत्स्यपालन व्यवसायात यश मिळवले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
advertisement
2/7
उझेब पाटील याने बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. पाच एकर क्षेत्रामध्ये शेततळे तयार करून मत्स्यपालनाला सुरुवात केली.
advertisement
3/7
सुरुवातीच्या टप्प्यात शेततळे तयार करण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी जवळपास 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यानंतर त्यांनी रुपचंद आणि फंगस या जातींच्या माशांची पिल्ले तळ्यामध्ये सोडली.
advertisement
4/7
या माशांच्या संगोपनासाठी शेततळ्यामध्ये फिश फूड तसेच तांदूळ टाकले जातात. माशांच्या वाढीला याचा मोठा फायदा होतो. तसेच शेततळ्यातील पाणी शेतीसाठीही वापरले जात असल्याने पाण्याचा दुहेरी फायदा मिळत आहे.
advertisement
5/7
शेततळ्यामधील रुपचंद आणि फंगस जातींचे मासे 9 महिन्यांत विक्रीला येतात. ही मासे व्यापारी थेट शेततळ्यावर येऊन खरेदी करतात. 80 ते 120 रुपये प्रति किलो असा दर या माशांना मिळतो. पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथील व्यापारीही या माशांची खरेदी करत असल्यामुळे चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
advertisement
6/7
उझेब पाटील यांनी सुरू केलेल्या मत्स्यपालन व्यवसायामध्ये दोन वर्षांपासून एक कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामामुळे खर्च वजा जाता उझेब पाटील यांना तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.
advertisement
7/7
उझेब पाटील सांगतात की, उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेती आणि व्यवसायामध्ये संधी शोधाव्यात. यश नक्कीच मिळते. त्यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मत्स्यपालनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : मत्स्यपालन व्यवसाय भारी, कमाई होते दुप्पट, पाटलांचा सक्सेस फॅार्म्युला!