TRENDING:

Success Story : फुलशेती ठरली वरदान, 50 हजार खर्चात 3 लाख निव्वळ नफा, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला

Last Updated:
शेतकरी रवींद्र भोकरे यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फुलशेतीची वाट निवडली. त्यातूनच यशाचा नवा मार्ग तयार केला आहे.
advertisement
1/7
फुलशेती ठरली वरदान, 50 हजार खर्चात 3 लाख निव्वळ नफा, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथील शेतकरी रवींद्र भोकरे यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फुलशेतीची वाट निवडली. त्यातूनच यशाचा नवा मार्ग तयार केला आहे.
advertisement
2/7
गेल्या पाच वर्षांपासून ते सातत्याने फुलशेती करत असून, दरवर्षी वेगवेगळ्या फुलांच्या लागवडीद्वारे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. यंदा त्यांनी एक एकर क्षेत्रात सुमारे 10 हजार 500 कलमांची नारंगी आणि अक्षदा येल्लो या झेंडूच्या वाणांची लागवड केली आहे.
advertisement
3/7
या लागवडीमधून यंदा दीडशे क्विंटलपर्यंत फुलांचे उत्पादन अपेक्षित असून, आतापर्यंत एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुढील काळात आणखी दोन लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून, एकूण उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत जाईल, असा विश्वास रवींद्र भोकरे यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
शिरोडी खुर्द हे गाव आधीपासूनच फुलशेतीसाठी ओळखले जाते. गावातील अनेक शेतकरी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
5/7
गतवर्षी याच फुलशेतीतून सुमारे 100 क्विंटल उत्पादन मिळाले होते आणि त्यातून 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न झाले होते. यंदाही फुलांची गुणवत्ता उच्च दर्जाची असल्याने चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण शेतीसाठी सुमारे 50 हजार रुपयांचा खर्च झाला असून, सर्व खर्च वजा जाता अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळेल, असे भोकरे यांनी सांगितले.
advertisement
6/7
फुलशेतीकडे वळू इच्छिणाऱ्या नवीन शेतकरी आणि तरुणांसाठी भोकरे यांनी मार्गदर्शनही केले आहे. झेंडूची लागवड करताना सुरुवातीच्या टप्प्यात मल्चिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे 20 ते 25 दिवस अधिक उत्पादन घेता येते आणि 10 ते 15 क्विंटल जादा उत्पादन मिळू शकते.
advertisement
7/7
योग्य फवारणी, ठिबक सिंचनाचे नियोजन केल्यास झेंडू लागवडीपासून चार महिने सातत्याने उत्पादन देतो आणि झाडांचीही चांगली वाढ होते. त्यामुळे फुलशेती करायची असल्यास मल्चिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला रवींद्र भोकरे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : फुलशेती ठरली वरदान, 50 हजार खर्चात 3 लाख निव्वळ नफा, शेतकऱ्याने सांगितला यशाचा फॉर्म्युला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल