Numerology: दुश्मनी या मूलांकाच्या लोकांशी घेऊ नये; डोक्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: जन्मतारखांवरून अंकशास्त्रात 1 ते 9 या सर्व मूलांकांच्या स्वभावाबद्दल माहिती दिली आहे. काही मूलांकाचे लोक चांगले मित्र असतात, तर काही मदतीसाठी तत्पर असतात. मात्र, या सर्वांमध्ये असा एक मूलांक आहे, ज्याच्याशी शत्रुत्व पत्करणे तुम्हाला महागात पडू शकते. आपण या लोकांशी वैर घेतले, तर ते तुम्हाला शांत बसू देणार नाहीत. त्यांच्या डोक्यात सतत तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचे किंवा अपमानित करण्याचे बेत सुरू असतात आणि संधी मिळताच ते तुम्हाला सावरून घेण्याची वेळही देत नाहीत.
advertisement
1/5

अंकशास्त्रातील सर्वात धोकादायक मूलांक - प्रत्येक मूलांकाचा स्वभाव त्याच्या प्रतिनिधी ग्रहावरून ठरतो. अनेकदा असे म्हटले जाते की मूलांक 1 चा स्वामी सूर्य असल्याने राजाशी शत्रुत्व नको. मूलांक 8 चा स्वामी शनी असल्याने तो कर्माप्रमाणे फळ देतो, त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व घेऊ नये. मूलांक 9 चा स्वामी मंगळ हा सेनापती असल्याने त्याचा राग भयंकर असतो. मात्र, सर्वात जास्त सावध मूलांक 4 च्या लोकांपासून राहायला हवे, कारण त्यांचे शत्रुत्व खूप जड जाते.
advertisement
2/5
मूलांक 4 ला शत्रू बनवू नका - अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. राहूला छाया ग्रह किंवा पापी ग्रह मानले जाते. पौराणिक कथेनुसार राहूकडे फक्त शिर आहे, त्यामुळे मूलांक 4 चे लोक अतिशय तल्लख बुद्धीचे असतात. जे लोक यांच्याशी काही चुकीचे वागतात, त्यांना हे लोक सहजासहजी सोडत नाहीत. यांच्या आयुष्यात संघर्ष असतो, हे इतरांना मदतही करतात, पण शत्रुत्व मात्र पूर्ण ताकदीने निभावतात.
advertisement
3/5
बुद्धीचा वापर करून प्लॅनिंग - राहूची बुद्धी खूप वेगाने चालते. हे लोक स्वतःहून कोणाचे नुकसान करत नाहीत, पण जेव्हा कोणी त्यांना त्रास देते, तेव्हा ते मागे हटत नाहीत. शत्रूचा बदला घेण्याची भावना त्यांच्यात प्रबळ असते. जोपर्यंत ते समोरच्याला पूर्णपणे हरवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या डोक्यात सतत तुमच्याविरुद्ध योजना सुरू असतात.
advertisement
4/5
मूलांक 4 वर राहूचा प्रभाव -या लोकांवर राहूचा प्रभाव असल्याने ते आपल्या शत्रूंना कधीच विसरत नाहीत. हे लोक अतिशय रहस्यमयी असतात, ते तुमच्यावर कधी पलटवार करतील हे कोणालाच समजत नाही. राहू आणि केतूने सूर्य-चंद्राशी शत्रुत्व घेतले होते, त्यामुळेच दरवर्षी त्यांना ग्रहण लागते असे मानले जाते. ज्या समस्येचे समाधान जगाकडे नसते, ते मूलांक 4 चे लोक चुटकीसरशी शोधतात. परिस्थितीचा वेगाने अंदाज घेण्याची त्यांची क्षमता अफाट असते.
advertisement
5/5
कोण असतात मूलांक 4 चे लोक?ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. हे लोक मुळात कोणाचे वाईट चिंतत नाहीत, पण कोणी यांच्या वाटेला गेले तर ते आक्रमक होऊन चोख उत्तर देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: दुश्मनी या मूलांकाच्या लोकांशी घेऊ नये; डोक्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत