नव्या मराठी मालिकेचं विचित्र प्रमोशन, महिलांमध्ये संतापाची लाट; सीरिअल न पाहण्याचा निर्णय
- Published by:Priya Lad
Last Updated:
New Marathi Serial : गेल्या काही दिवसांपासून या नव्या मराठी मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. पण आता प्रदर्शित होण्याआधीच महिलांनी ही मालिका न पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/7

मराठी मालिका </a>येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेचे पोस्टर, प्रोमो फिरत आहेत. यापैकीच एक मराठी मालिका येण्याआधीच वादात सापडली आहे." width="1600" height="900" /> कित्येक मराठी चॅनेल्सवर वेगवेगळ्या नवीन मराठी मालिका येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मालिकेचे पोस्टर, प्रोमो फिरत आहेत. यापैकीच एक मराठी मालिका येण्याआधीच वादात सापडली आहे.
advertisement
2/7
या नव्या मराठी मालिकेचे गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रोमो समोर आले आहेत. या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. पण आता अशा पद्धतीने याचं प्रमोशन करण्यात आलं आहे की महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
3/7
फक्त पुरुष हवेत असं म्हणत महिलांना थेट नाकारणारी अशी मालिकेच्या प्रमोशनची ही पोस्ट. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही सीरिअल्स पाहणार नाही, महिला मालिकाही पाहणार नाही अशा कमेंट आल्या आहेत.
advertisement
4/7
महिलांमध्ये प्रचंड संतापाची लाट, जय खानोलकर म्हणतो स्त्रियांना कंपनीत प्रवेश नाही! असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. जय खानोलकर नावाच्या व्यक्तीची ही पोस्ट, ज्याने आपल्या ऑफिसमध्ये भरतीसाठी ही जाहिरात दिली आहे. ज्यात फक्त पुरुष हवे असल्याचा उल्लेख आहे.
advertisement
5/7
झी मराठी चॅनेलवरील सनई चौघडे मालिकेचं हे प्रमोशन आहे. ज्यात जय खानोलकर नावाचं पात्र आहे. जो महिलांचा तिरस्कार करतो अशी त्याची भूमिका आहे. अभिनेता राज हंचनाळे याने हे पात्र साकारलं आहे. त्याच्या फोटोंसह ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
advertisement
6/7
16 मार्चपासून सुरू होणारी ही मालिका रात्री 8.30 वाजता दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मेघना एरंडे अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने या मालिकेत 4 मुलींच्या आई प्रमिला सुभाष परबची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अदिती सारंगधर तेजस्विनी खानोलकर म्हणजे जयच्या आईच्या भूमिकेत आहे.
advertisement
7/7
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील सुहास शिरसाटने 4 मुलींचा बाबा सुभाष परबची भूमिका केली आहे. भूमिकेत आहे. तर चार मुलींच्या भूमिकेत चार 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेतील सखी म्हणजेच अभिनेत्री चिन्मयी साळवी, जुई गोगरी, रुची नेरुरकर यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नव्या मराठी मालिकेचं विचित्र प्रमोशन, महिलांमध्ये संतापाची लाट; सीरिअल न पाहण्याचा निर्णय