'मला घाणीत...', बॉलीवूडबाबत हे काय बोलून गेली 'देसी गर्ल'; प्रियांका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Priyanaka Chopra : बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडून हॉलीवूडमध्ये पदार्पण का केलं? याबाबत उत्तर देताना तिने असं काही सांगितलं ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जी देसी गर्ल म्हणून ओळखली जाते. काही भारतीय फिल्ममध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना ती हॉलिवूडमध्ये गेली. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वीच यामागील कारण सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा याचं कारण सांगताना तिने असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
प्रियांका चोप्राने 2015 मध्ये क्वांटिको फिल्मद्वारे तिचा हॉलिवूड प्रवास सुरू केला. प्रियांका चोप्राने नुकतंच नॉट स्किनी बट नॉट फॅट या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिला हॉलिवूडची वाट का धरली याबाबत विचारण्यात आलं.
advertisement
3/7
प्रियांका म्हणाली, "मी जेव्हा भारतात काम करत होते तेव्हा मला मर्यादित वाटू लागलं. मला बाहेर काय आहे ते पाहायचं होतं"
advertisement
4/7
प्रियांका चोप्राने सांगितलं जेव्हा तिने हॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यासाठी कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता. ती म्हणाली, "मला फक्त एवढंच माहित आहे की मी एक मेहनती व्यक्ती आहे आणि मला माझं काम माहित आहे. मला कोणत्याही चित्रपट निर्मात्यासोबत किंवा को-स्टारसह सेटवर ठेवा आणि मी त्याच्याविरुद्ध उभी राहीन."
advertisement
5/7
प्रियांकाने हॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या दोन अभिनेत्रींची नावे देखील घेतली. "मिंडी कलिंग आणि ऐश्वर्या राय व्यतिरिक्त हॉलिवूडमध्ये खूप कमी महिला किंवा पुरुष भारतीय कलाकार होते. आम्हाला प्रतिनिधित्व का मिळालं नाही, याचं आश्चर्य मला वाटलं. यामुळे मला अमेरिकेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासारखं वाटलं, जिथं माझ्यासारखे कोणीही दिसत नव्हतं"
advertisement
6/7
"त्यावेळी मी त्याबद्दल फारसा विचार केला नव्हता. पण हॉलिवूडमध्ये काम शोधू लागले तेव्हा मला प्रश्न पडला की मी कुठे आहे? मी कशी सुरुवात करू? बाहेर कोणत्या शक्यता आहेत हे पाहण्याची इच्छा आणि गरज यातून ते आलं, असं ती म्हणाली.
advertisement
7/7
प्रियांका म्हणाली, "मी अशी व्यक्ती आहे जिला घाणीत राहणं आवडत नाही कारण नंतर तुम्हाला वासाची सवय होते. मी बदलावर खूप विश्वास ठेवते. जेव्हा जीवन कठीण होतं, तेव्हा आपण माणूस म्हणून खूप मजबूत असतो. आपल्यात स्वतःला उचलण्याची, स्वतःला स्वच्छ करण्याची, भावनिक होण्याची, वेदना अनुभवण्यासाठी थोडा वेळ काढण्याची आणि नंतर बदल करण्याची क्षमता असते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला घाणीत...', बॉलीवूडबाबत हे काय बोलून गेली 'देसी गर्ल'; प्रियांका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ