बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, नणंदेचं अवघ्या 30 व्या वर्षी निधन, नेमकं काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priyanka Chopra-Nick Jonas: बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्राच्या आईच्या निधनाची दुःखद बातमी समोर येण्याच्या काही तासांतच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
1/9

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्राच्या आईचं कॅन्सर या गंभीर आजाराने निधन झालं. ही दुःखद बातमी समोर येण्याच्या काही तासांतच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
2/9
प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याच्या बहिणीचं अवघ्या ३० व्या वर्षी निधन झालं असून संपूर्ण जोनस कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
advertisement
3/9
निकची बालपणीची मैत्रीण आणि त्याची मानलेली बहीण माया किबेलच्या जाण्याने जोनस कुटुंब दुःखात बुडालं असून तिच्या जाण्याने सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
4/9
मायाच्या आईने सोशल मीडियावर अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट लिहित तिच्या निधनाची बातमी दिली. गेल्या काही काळापासून माया 'विल्सन डिसीज' (Wilson Disease) नावाच्या एका अत्यंत दुर्मिळ अनुवंशिक आजाराशी झुंज देत होती.
advertisement
5/9
७ मार्च रोजी सकाळी माया अचानक बेशुद्ध पडली. तिचं हृदय आणि फुफ्फुसांनी काम करणं थांबवलं. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू झाले होते परंतु डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि इमर्जन्सी रूममध्येच तिने अखेरचा श्वास घेतला.
advertisement
6/9
मायाला जडलेला विल्सन डिसीज अतिशय दुर्मिळ असून यामध्ये शरीरात कॉपर साठून राहते, ज्याचा थेट परिणाम लिव्हर आणि मेंदूवर परिणाम होतो.
advertisement
7/9
मायाच्या आईने लिहिलं, "ती इतक्या वेदनेत असायची की रडता रडता तिला झोप लागायची. पण आता ती तिच्या बाबांकडे स्वर्गात गेली आहे, जिथे तिला कोणताही त्रास होणार नाही आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूही येणार नाहीत. मुलगी म्हणून ३० वर्ष तिची साथ लाभली, पण आज माझं हृदय पूर्णपणे तुटलं आहे."
advertisement
8/9
माया ही केवळ निक जोनसची शेजारी नव्हती, तर ती निक आणि जो जोनस यांची बालपणीची सर्वात जवळची मैत्रीण होती. जोनस कुटुंबात तिला मुलीसारखा मान होता आणि प्रियांका देखील तिच्याशी नणंदेप्रमाणे जवळीक ठेवून होती.
advertisement
9/9
निकच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये माया नेहमीच त्यांच्या कुटुंबाचा भाग म्हणून दिसायची. तिच्या अशा अचानक जाण्याने जोनस ब्रदर्सचे चाहते देखील सोशल मीडियावर मायाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, नणंदेचं अवघ्या 30 व्या वर्षी निधन, नेमकं काय घडलं?