'होय, माझ्याकडून चूक झाली...', वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्याचा मोठा खुलासा, ड्रेसिंग रुममध्ये मागितली होती ऑलराऊंडरची माफी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Apologies Axar Patel : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कॅप्टन सूर्याने खुलेआम आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली. सूर्याने अक्षर पटेलची जाहीर माफी मागितली होती.
advertisement
1/5

टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. अशातच आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कॅप्टन सूर्याने खुलेआम आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली. सूर्याने अक्षर पटेलची जाहीर माफी मागितली होती.
advertisement
2/5
'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सूर्याने त्या कठीण प्रसंगाची आठवण करून दिली. सूर्या म्हणाला, "अक्षर खूप रागात होता आणि त्याने मनात राग धरणं योग्य होतं. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि एका मोठ्या फ्रँचायझीचे नेतृत्व करतो, त्यामुळे अशा वेळी राग येणे स्वाभाविक आहे.
advertisement
3/5
मी त्याची माफी मागितली आणि माझी चूक मान्य केली." हा निर्णय घेताना केवळ टीमचे हित समोर होतं, असं स्पष्टीकरणही कॅप्टन सूर्याने दिलं. तरीही एका मॅच विनरला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं, असंही सूर्या यावेळी म्हणाला.
advertisement
4/5
"आमच्या दोघातली ती चर्चा खूप कठीण होती, पण टीमच्या रणनीतीसाठी मला तो निर्णय घ्यावा लागला होता. मला त्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला आणि मी तसं अक्षरला मोकळेपणाने सांगितलं," असं सूर्याने स्पष्ट केलं. अक्षर पटेलनेही मॅच संपल्यानंतर मोठ्या मनाने ही परिस्थिती स्वीकारली.
advertisement
5/5
दरम्यान, दोघांमध्ये दुसऱ्या दिवशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांच्यातील गैरसमज दूर झाले. विशेष म्हणजे, या एका मॅचचा अपवाद वगळता अक्षरने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'होय, माझ्याकडून चूक झाली...', वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्याचा मोठा खुलासा, ड्रेसिंग रुममध्ये मागितली होती ऑलराऊंडरची माफी!