नाहिद राणाची भेदक बॉलिंग
बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शाहीन शाह आफ्रिदीने मान्य केलं की, टीमला ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती, तशी सुरुवात या पहिल्या मॅचमध्ये होऊ शकली नाही. नाहिद राणा याने अतिशय भेदक बॉलिंग केली आणि त्याने पाकिस्तानच्या बॅटिंग लाईनअपला अडचणीत आणलं, असं म्हणत शाहीनने नाहिद राणावर पराभवाचं खापर फोडलं.
advertisement
आमची एक तरुण टीम - शाहीन शाह आफ्रिदी
पराभवानंतर बोलताना शाहीन म्हणाला की, जेव्हा तुम्ही मॅच हरता तेव्हा चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे असतात. मात्र, ही एक तरुण टीम असून मी या खेळाडूंच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहीन. पहिल्या मॅचमधील निकाल जरी विरोधात असला, तरी अजून 2 मॅच शिल्लक आहेत आणि आमची टीम त्या आव्हानांसाठी पूर्णपणे तयार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार
दरम्यान, कॅप्टन म्हणून शाहीनने आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखवला असून, पुढच्या सामन्यात दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला. या पराभवामुळे टीम खचलेली नसून पुढच्या मॅचसाठी सज्ज आहे, असे त्याने स्पष्ट केलं आहे. पण पाकिस्तानची पुढची मॅच कशी असते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तान ही मालिका 3-0 ने गमावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
