TRENDING:

घरात उरलेला शिळा भात फेकून देताय? झटपट बनवा पनीर फ्राईड राइस, रेसिपीचा Video

Last Updated:

शिळा भात चविष्ट पदार्थात बदलता येतो. शिळ्या भातापासून झटपट आणि सोप्या पद्धतीने पनीर फ्राईड राइस बनवता येतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घरात अनेकदा रात्रीचा भात उरतो आणि दुसऱ्या दिवशी तो खायचा की फेकून द्यायचा असा प्रश्न पडतो. पण थोडी कल्पकता वापरली तर हाच शिळा भात चविष्ट पदार्थात बदलता येतो. शिळ्या भातापासून झटपट आणि सोप्या पद्धतीने पनीर फ्राईड राइस बनवता येतो. भाज्या आणि पनीर घालून बनवलेला हा पदार्थ चवदार तर लागतोच, शिवाय नाश्ता, डबा किंवा हलक्या जेवणासाठीही उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग पाहूया, शिळ्या भातापासून पनीर फ्राईड राइस कसा बनवायचा.
advertisement

 पनीर फ्राईड राइस साहित्य

2 वाट्या शिळा भात, 150 ग्रॅम पनीर (चौकोनी तुकडे), 1 कांदा (बारीक चिरलेला), 1 गाजर (बारीक काप), 1/2 कप ढोबळी मिरची, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, मीठ आणि मिरी पूड चवीनुसार, 2 चमचे तेल,

सजावटीसाठी कोथिंबीर हे साहित्य लागेल.

advertisement

हास्यजत्रे'तील कलाकारही या चवीचे फॅन! मुंबईत मिळतंय अस्सल घरगुती मालवणी जेवण

कसा कराल तयार

कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घालून परता. त्यात गाजर आणि ढोबळी मिरची टाकून 2–3 मिनिटे शिजवा. आता शिळा भात घालून सगळे नीट मिक्स करा. सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि मिरी पूड घालून चांगले हलवा. शेवटी परतलेले पनीर घालून 2 मिनिटे फ्राय करा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

advertisement

विशेष टिप:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
सर्व पहा

भात थोडा कोरडा असेल तर फ्राईड राइस जास्त चांगला लागतो. त्यामुळे शिळा भात या रेसिपीसाठी अगदी योग्य ठरतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
घरात उरलेला शिळा भात फेकून देताय? झटपट बनवा पनीर फ्राईड राइस, रेसिपीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल