TRENDING:

गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही

Last Updated:

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. जर तुम्ही देखील यावर्षी गुढीपाडव्याला नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ती गाडी बजेटमध्ये, चांगल्या फीचर्ससह आणि उच्च सेफ्टीसह हवी असेल, तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात मानला जाणारा सण आहे. या शुभ दिवशी अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात. विशेषतः घरात नवीन वाहन आणण्याची परंपरा देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असतात. जर तुम्ही देखील यावर्षी गुढीपाडव्याला नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ती गाडी बजेटमध्ये, चांगल्या फीचर्ससह आणि उच्च सेफ्टीसह हवी असेल, तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी अलीकडेच लॉन्च झालेली Tata Motors ची इलेक्ट्रिक SUV म्हणजे Tata Punch EV सध्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या गाडीचा बेस व्हेरिएंट Smart देखील चांगल्या फीचर्ससह येतो. त्यामुळे कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक SUV घ्यायची असल्यास हा पर्याय लक्षात घेण्यासारखा आहे.
advertisement

 

बॅटरी आणि रेंज

 

advertisement

Tata Punch EV Smart या बेस मॉडेलमध्ये 30 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीच्या ARAI प्रमाणित आकडेवारीनुसार या गाडीची रेंज सुमारे 315 ते 325 किमीपर्यंत जाऊ शकते. शहरातील वापरात साधारण 250 ते 300 किमीपर्यंत रेंज मिळू शकते. चार्जिंगसाठी या गाडीत DC फास्ट चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. या चार्जरद्वारे बॅटरी 20 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत साधारण 26 मिनिटांत चार्ज करता येते. याशिवाय घरच्या घरी AC चार्जरद्वारे देखील गाडी चार्ज करता येते.

advertisement

कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video

बॅटरी आणि रेंज

 

advertisement

Tata Punch EV Smart या बेस मॉडेलमध्ये 30 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीच्या ARAI प्रमाणित आकडेवारीनुसार या गाडीची रेंज सुमारे 315 ते 325 किमीपर्यंत जाऊ शकते. शहरातील वापरात साधारण 250 ते 300 किमीपर्यंत रेंज मिळू शकते. चार्जिंगसाठी या गाडीत DC फास्ट चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. या चार्जरद्वारे बॅटरी 20 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत साधारण 26 मिनिटांत चार्ज करता येते. याशिवाय घरच्या घरी AC चार्जरद्वारे देखील गाडी चार्ज करता येते.

advertisement

 

इंटीरियर आणि फीचर्स

 

Punch EV Smart या बेस मॉडेलमध्ये आवश्यक आणि उपयुक्त फीचर्स दिले आहेत. गाडीत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि पॉवर विंडोज उपलब्ध आहेत. डॅशबोर्ड ड्युअल टोन डिझाइनमध्ये असल्यामुळे गाडीच्या आतला लुक आकर्षक दिसतो. सीट्स फॅब्रिक मटेरियलमध्ये आहेत आणि पुढील सीट्स आरामदायी डिझाइनमध्ये दिल्या आहेत. मागील सीटवर तीन प्रवाशांसाठी पुरेशी जागा मिळते.Punch EV चा बाहेरील लुक मजबूत आणि आधुनिक आहे. गाडीच्या पुढील बाजूला LED DRL लाईट्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि स्टायलिश फ्रंट डिझाइन दिले आहे.  

कॉम्पॅक्ट SUV असल्यामुळे शहरात चालवणे सोपे जाते. तसेच 195 mm ग्राउंड क्लीयरन्स असल्यामुळे खराब रस्त्यांवरही गाडी सहज चालवता येते.

 

सेफ्टी फीचर्स

 

सेफ्टीच्या बाबतीत Tata Motors च्या गाड्या नेहमीच मजबूत मानल्या जातात. Punch EV मध्ये देखील चांगले सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या गाडीत ड्युअल एअरबॅग, ABS with EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड कंट्रोल आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स दिले आहेत. मजबूत बॉडी स्ट्रक्चरमुळे गाडीची सुरक्षितता अधिक चांगली राहते. Punch EV मध्ये सुमारे 366 लिटर इतका बूट स्पेस मिळतो. त्यामुळे लांब प्रवास करताना बॅगा आणि सामान ठेवण्यासाठी चांगली जागा मिळते. Smart बेस मॉडेलमध्ये सनरूफ उपलब्ध नाही. हा फीचर वरच्या व्हेरिएंटमध्ये दिला जातो. मात्र सीट्स आरामदायी आहेत आणि ड्रायव्हिंग पोझिशन उंच असल्यामुळे SUV चालवण्याचा अनुभव मिळतो.

 

किंमत

 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
सर्व पहा

Tata Punch EV Smart या बेस मॉडेलची किंमत सुमारे ₹9.69 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही गाडी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये तुलनेने परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असल्यामुळे अनेक ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. याशिवाय कंपनीकडून BaaS (Battery as a Service) हा पर्याय देखील दिला जातो. या पर्यायामध्ये गाडीची सुरुवातीची किंमत कमी ठेवली जाते आणि बॅटरीसाठी प्रति किलोमीटर वेगळे शुल्क द्यावे लागते. त्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी करून इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अनेक ग्राहकांसाठी सोपे होते.

मराठी बातम्या/ऑटो/
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल