Hybrid vs EV: नवी कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती बेस्ट?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतात वेगाने बदलत्या ऑटोमोबाईल बाजारात आता पेट्रोल-डिझेल कार व्यतिरिक्त हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणाविषयी वाढत्या चिंते दरम्यान लोक आता नवीन टेक्नॉलॉजीच्या कारकडे वळत आहेत.
नवी दिल्ली : भारतात वेगाने बदलत्या ऑटोमोबाईल बाजारात आता लोक पेट्रोल-डिझेल कार व्यतिरिक्त नवीन टेक्नॉलॉजीकडे लक्ष देत आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक कार आणि हायब्रिड कारविषयी खूप चर्चा सुरु आहे. सरकारही प्रदूषण कमी करणे आणि इंधनावर अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देत आहे. मात्र प्रश्न उपस्थित होतो की, सामान्य मानसासाठी कोणता ऑप्शन बेस्ट आहे, हायब्रिड कार की इलेक्ट्रिक कार? चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
ईव्ही कार म्हणजे काय?
इलेक्ट्रिक कार पूर्णपणे बॅटरीवर चालतात आणि त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसते. या कार चार्ज करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. भारतात अनेक कंपन्यांनी ईव्ही लाँच केल्या आहेत, ज्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. ईव्ही कारचे फायदे:
- इंधन खर्च जवळपास संपतो
- प्रदुषण खुप कमी होते
- मेंटेनेंसचा खर्च कमी
advertisement
हायब्रिड कार म्हणजे काय?
हायब्रिड कारमध्ये पेट्रोल इंजिनसह एक इलेक्ट्रिक मोटरही असते. म्हणजेच ही कार पेट्रोल आणि वीज दोन्हीने चालते. यामुळे मायलेज चांगले होते आणि इंधन कमी लागते. भारतात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर सारख्या कार या सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहेत. हायब्रिड कारचे फायदे :-
advertisement
- पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त मायलेज
- चार्जिंगचं टेन्शन नाही
- दूरच्या प्रवासासाठी बेस्ट
सर्वसामान्यांसाठी कोणती बेस्ट?
तुम्ही शहरात जास्त ड्राइव्ह करत असाल आणि तुमच्या आजुबाजूला चार्जिंग स्टेशन उपलब्ध असतील. तर EV एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. यामुळे इंधन खर्चात खुप बचत होऊ शकते. तसंच तुम्ही नेहमीच लांबचा प्रवास करत असाल किंवा अशा परिसरात राहत असाल जिथे चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर कमी आहे. तर हायब्रिड कार जास्त प्रॅक्टिकल ऑप्शन ठरु शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 7:26 PM IST








