TRENDING:

सुपरस्टारने मंदिरात केली चोरी! प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:च दिली कबुली; म्हणाला, 'मी देवाला घाबरत नाही!'

Last Updated:
एका फिल्मच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बड्या बॉलिवूड अभिनेत्याने स्वत:च आपण मंदिरात पैशांची चोरी केल्याचा खुलासा केला आहे.
advertisement
1/7
सुपरस्टारने मंदिरात केली चोरी! प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:च दिली कबुली; म्हणाला, 'मी देवाला घाबरत नाही!'
सेलिब्रिटी, सुपरस्टार म्हणजे त्यांच्याकडे पैशांची काही कमी नाही. पण एक असा सुपरस्टार ज्याने चक्क चोरी केली आहे. तीसुद्धा मंदिरात. आपण मंदिरातून पैसे चोरले, अशी कबुली या प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:च दिली आहे. एका सीरिजच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याने चोरीबाबत सांगितलं.
advertisement
2/7
अभिनेत्याने सांगितलं, "आमच्याकडे एक हनुमान मंदिर होतं. जिथं शनिवारी लोक मूर्तीला चंदन लावून पैसे चिकटवायचे, मी ते चोरायचो. मी देवाला घाबरत नाही, मला अजूनही देवाची भीती वाटत नाही"
advertisement
3/7
अभिनेत्याने मंदिरात तो चोरी का करायचा यामागील कारणही सांगितलं आहे. तो म्हणाला, "मला वाटायचं की देव माझ्यावर प्रेम करतो आणि लोकांनी ते पैसे माझ्यासाठीच लावले आहेत"
advertisement
4/7
अभिनेत्याने सुरुवातीच्या काळात बस आणि ट्रेनमध्ये विना तिकिट प्रवास केल्याचंही सांगितलं. शेवटी तो म्हणाला, की त्याचे वडील एक पुजारी, त्यांनी या गोष्ट चुकीची असल्याचं त्याला सांगितलं. त्यानंतर जसं वय वाढत गेलं तशा त्याने या वाईट चुकीच्या सवयी सोडल्या.
advertisement
5/7
या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे कुणीच त्या करू नयेत, अशी विनंतीही त्याने चाहत्यांना केली आहे.  हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर अभिनेता रवी किशन आहे.
advertisement
6/7
रवी किशनची मामला लीगल है 2 ही वेब सीरिज 3 एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 2024 मध्ये आलेल्या मामला लीगल है सीरिजचा दुसरा सीझन.
advertisement
7/7
मामला लीगल है 2 च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात रवीने त्याच्या आयुष्यातील बालपणीचा हा विचित्र आणि मजेशीर किस्सा सांगितला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुपरस्टारने मंदिरात केली चोरी! प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:च दिली कबुली; म्हणाला, 'मी देवाला घाबरत नाही!'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल