32km मायलेज, 360° कॅमेरासह 6 एयरबॅग! ही आहे 7 लाखांहून स्वस्त बेस्ट हॅचबॅक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचं बजेट 7 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर बाजारात अनेक शानदार ऑप्शन उपलब्ध आहेत. Maruti Swift, Tata Tiago, WagonR पासून Baleno आणि Citroen C3 पर्यंत या कार मायलेज, सेफ्टी आणि फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहेत. जाणून घेऊया कोणती कार तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरु शकते.
advertisement
1/8

Maruti Suzuki Swift: ही तरुणांची पहिली पसंत आणि मायलेजची राणी आहे. याचा स्पोर्ट लूक आणि दमदार 1.2 लिटर Z-सीरीज इंजिन याला खास बनवते. ही कार जवळपास 24-25 kmpl चं शानदार मायलेज देते. जी CNG मध्ये वाढून 32.85 km/kg होते. ही 6 एयरबॅग आणि 360 डिग्री कॅमेरासह येते. किंमत 5.99 लाख (एक्स-शोरुम) ने सुरू होते.
advertisement
2/8
Tata Tiago: यामध्ये सेफ्टी आणि मजबूती चांगली आहे. या कारला ग्लोबल NCAP द्वारे 4-स्टार सेफ्टी मिळाली आहे. ही कार फक्त मजबूत नाही तर याचं म्यूझिक सिस्टम आणि राइड क्वालिटीही प्रीमियम आहे. 5.65 लाख रुपयांच्या सुरुवाती किंमतीत ती चांगली फॅमिली कार आहे.
advertisement
3/8
Hyundai Grand i10 Nios: ही हॅचबॅक आपल्या शानदार इंडीयिर आणि स्मूथ इंजिनसह ओळखली जाते. यामध्ये तुम्हाला 8-इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि 6 एयरबॅग्ससारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. शहरातील गर्दीत ड्रायव्हिंगसाठी याचं ऑटोमॅटिक (AMT) व्हेरिएटं 7 लाखांच्या बजेट असणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
4/8
Maruti Suzuki Wagon R: टॉल बॉय डिझाईनमुळे वॅगन-आरमध्ये चढणे आणि उतरणे खूप सोपे होते. यामध्ये भरपूर लेगरूम आणि हेडरूम आहे, ज्यामुळे वृद्धांसाठीही ती आरामदायी बनते. पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध असलेली ही कार 34 km/kg पर्यंत इंधन बचत देते, तर तुमच्या खिशासाठीही सौम्य आहे.
advertisement
5/8
Tata Altroz: ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये येते. खरंतर याचे टॉप मॉडल महाग आहेत. मात्र याचं XE आणि XM व्हेरिएंट 6.65 लाख रुपयांच्या आसपास आहेत. तुम्ही हायवेवर जास्त चालत असाल आणि एक स्टेबल, सुरक्षित आणि गुड लुकिंग हॅचबॅक तुम्हाला हवी असेल तर अल्ट्रोजपेक्षा बेस्ट काहीच नाही.
advertisement
6/8
Maruti Suzuki Baleno: ही सध्या देशातील सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक आहे. तिच्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 6.66 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात प्रशस्त केबिन, 318 लिटर बूट स्पेस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सारखी आवश्यक फीचर्स आहेत. मोठ्या कुटुंबासाठी हा एक स्पेसियस ऑप्शन आहे.
advertisement
7/8
Renault Kwid: कमी बजेटमध्ये तुम्हाला दमदार आणि उंच कार हवी असेल तर रेनो क्विड बेस्ट आहे. याचं 184mm चं ग्राउंड क्लीयरेन्स खराब रस्त्यांवर सहज चालते. 7 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही याचं टॉप मॉडल Climber आरामात घेऊ शकता. ज्यामध्ये टचस्क्रीन आणि मॉडर्न ग्राफिक्स मिळतात.
advertisement
8/8
Citroen C3: फ्रेंच कंपनी सिट्रोएनची C3 आपल्या कंफर्टेबल राइडसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सस्पेंशन खडबडीत रस्ते जाणवू देत नाही. 6.16 लाख रुपये पासून सुरू होणारी ही कार भरपूर जागा आणि अतिशय उत्तम इंजिन देते. ज्यांना सामान्यपेक्षा वेगळे काहीतरी हवे आहे त्यांच्यासाठी हे परिपूर्ण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
32km मायलेज, 360° कॅमेरासह 6 एयरबॅग! ही आहे 7 लाखांहून स्वस्त बेस्ट हॅचबॅक