Choosing Perfect Bra : परफेक्ट ब्रा कशी निवडायची? 'या' सोप्या पद्धतीने मोजा, सेकंदात कळेल तुमची योग्य साईज..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to choose perfect size bra : बऱ्याच महिला आणि मुलींचा हा प्रॉब्लेम असतो की, त्यांना त्यांच्या ब्राची साईज व्यवस्थित मिळत नाही. काही वेळा तर त्यांना साईज माहीतच नसते. पण यात काळजी करण्यासारखा काही नाही. काही सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमच्यासाठो परफेक्ट ब्रा निवडू शकता.
advertisement
1/5

एका अहवालात सांगितलं गेलं आहे की, जगभरात सुमारे 70 टक्के महिला त्यांच्या शरीराच्या प्रकारानुसार योग्य ब्रा घालत नाहीत, तर चुकीच्या आकार आणि साईजची ब्रा घालतात. ब्रा फक्त फॅशन नाही तर ती महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
advertisement
2/5
अयोग्य साईजची ब्रा घातल्याने आपल्या छातीत वेदना होऊ शकतात. यूकेमध्ये पोर्ट्समाउथ विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात स्तनाचा आकार, ब्रा फिटिंग आणि छातीच्या वेदनांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. या अभ्यासात कळाले की, 10 पैकी 7 महिलांना त्यांच्या ब्रेस्टची योग्य साईज माहित नसते. या चुकीच्या करामुळे पाठीचा कणा आणि मानेच्या वेदना होऊ शकतात.
advertisement
3/5
अभ्यासानुसार, चुकीची ब्रा आरोग्य तर धोक्यात आणतेच सोबतच आपला आत्मविश्वासही कमी करू शकते. योग्य साईजपेक्षा लहान ब्रा घातल्याने पुरळ, रक्ताभिसरण समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याउलट खूप सैल ब्रा घातल्याने स्तनांची झीज लवकर होऊ शकते आणि यामुळे वेदना होतात.
advertisement
4/5
अभ्यासात सांगितलं गेलं आहे की, ब्राची योग्य साईज मोजण्यासाठी आधी स्तनाच्या खालच्या बरगडीवर मीटर टेप ठेऊन साईज मोजा. हा आकडा तुमची बँड साईज असतो. यानंतर स्तनांचा सर्वात रुंद भाग मोजा आणि फरक शोधा. उदाहरणार्थ, 1 इंच अंतर = ए कप, 2 इंच = बी कप आणि 3 इंच = सी कप.
advertisement
5/5
म्हणजेच जर तुमची बँड साईज 34 असेल आणि तुमच्या छातीचा आकार 37 असेल, तर तुमचा आकार 34C असेल. मात्र ब्रा ट्राय करताना या साईजसोबतच ब्राच्या पट्ट्या खांद्यावर आणि पाठीवर घट्ट आहेत आणि कपमध्ये कोणतेही अंतर नाही ना. हेही तपासा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Choosing Perfect Bra : परफेक्ट ब्रा कशी निवडायची? 'या' सोप्या पद्धतीने मोजा, सेकंदात कळेल तुमची योग्य साईज..