TRENDING:

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्री गाजवली, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू; घरात आढळला मृतदेह

Last Updated:

रील स्टार अरुण तुपेच्या निधनाची बातमी ताजी असताना मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दोन दिवसांआधी छत्रपती संभाजीनगरचा रीलस्टार अरुण तुपेचं निधन झालं. त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी सापडला. या धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. अरुण तुपेच्या निधनाची बातमी ताजी असताना मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात.
News18
News18
advertisement

मनोरंजन विश्वाल चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करून आपली ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याचा मृत्यदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. त्याच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

( पुण्यात Radio Jockey चा जॉब अन् अभिजित खांडकेकरची ती धक्कादायक सकाळ, ऐकून प्रार्थना बेहेरेही झाली शॉक, VIDEO )

advertisement

अभिनेता हरी मुरलीचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालंय. तो प्रामुख्याने मल्याळम सिनेमात काम करत होता. त्याने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून जवळपास 50 सिनेमात काम केलं होतं. सध्या तो इंडस्ट्रीत VFX आर्टिस्ट म्हणून काम करत होता. अचानक त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला. त्याला तात्काळ पप्यानूर येथील बेबी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

advertisement

अभिनेता हरी मुरलीनं मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. 'अन्नम थामी' 'उलाकम चुट्टुम वालिबन', 'डॉन', 'पट्टानाथिल भूतम' हे त्याचे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून लोकप्रिय झालेले सिनेमे आहेत.

दरम्यान काही वर्षांआधी त्याने अभिनय सोडला. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत असताना त्याचं शालेय जीवन खूप चॅलेंजिंग झालं होतं. शाळेतील मित्रांनी त्याच्यापासून ठराविक अंतर पाळलं होतं. तो खूप फेमस असल्याने त्याच्या जवळ यायला मित्र देखील संकोच करायचे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

हरी मुरलीला त्याच्या घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. के.यू. मुरली हे त्याचे वडिल आहे. ज्यांना पय्यन्नूर मुरली या नावाने ओळखलं जातं. गेल्या तीन दशकांपासून ते मल्याळम इंडस्ट्रीत काम करत आहेत. प्रसन्ना असं हरीच्या आईचं नाव आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
चाइल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्री गाजवली, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू; घरात आढळला मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल