TRENDING:

केतूची 'मघा' नक्षत्रात एन्ट्री! पुढचे 9 महिने 5 राशींसाठी ठरणार 'गोल्डन डेज', संपत्तीचे मार्ग होणार मोकळे

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार 9 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी सावली ग्रह मानला जाणारा केतूने 'मघा' नक्षत्रात प्रवेश केला आहे. केतू हा मोक्ष, अध्यात्म आणि गूढ विद्येचा कारक आहे, तर मघा नक्षत्राचा स्वामी देखील स्वतः केतूच आहे. स्वतःच्या नक्षत्रात केतूचे हे आगमन अत्यंत शक्तिशाली मानले जाते.
advertisement
1/7

2/7
केतू 5 डिसेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात राहणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा विशेष प्रभाव 5 राशींवर सकारात्मक आणि आव्हानात्मक अशा दोन्ही स्वरूपात पाहायला मिळेल.
advertisement
3/7
वृषभ - मालमत्ता आणि मानसिक सुख: केतूचे हे गोचर तुमच्या चतुर्थ भावातून होईल. घरामध्ये काही धार्मिक कार्ये संपन्न होतील. मालमत्तेशी संबंधित जुने वाद सुटण्यास मदत होईल, परंतु घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक सुखाकडे तुमचा कल वाढेल.
advertisement
4/7
कर्क - आर्थिक नियोजनात बदल: तुमच्या दुसऱ्या भावात केतूचे आगमन होत आहे. यामुळे अचानक धनलाभाचे योग येतील, मात्र पैशांच्या गुंतवणुकीबाबत मनात संभ्रम राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना स्पष्टवक्तेपणा टाळा, अन्यथा विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. जुन्या बचतीचा योग्य वापर कराल.
advertisement
5/7
सिंह - व्यक्तिमत्वात गूढ बदल: मघा नक्षत्र हे सिंह राशीच्या अंतर्गत येते, त्यामुळे तुमच्याच राशीत केतूचे हे संक्रमण होत आहे. तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता येईल आणि तुम्ही अधिक अंतर्मुख व्हाल. समाजात तुमची एक वेगळी आणि गूढ प्रतिमा निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
6/7
तूळ - सामाजिक संबंध आणि लाभ: तुमच्या अराव्या भावात केतूचे गोचर होत आहे. हे गोचर तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरेल. जुन्या मित्रांकडून किंवा मोठ्या भावाकडून अनपेक्षित मदत मिळेल. सामाजिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग वाढेल, ज्यामुळे तुमच्या जनसंपर्कात वाढ होईल.
advertisement
7/7
मकर - संशोधन आणि अध्यात्म: तुमच्या आठव्या भावात केतूचे भ्रमण होणार आहे. जे जातक ज्योतिष, विज्ञान किंवा संशोधनाच्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ असेल. तुम्हाला गूढ विषयांची ओढ लागेल. वारसाहक्क संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे, मात्र प्रवासात सावधगिरी बाळगा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
केतूची 'मघा' नक्षत्रात एन्ट्री! पुढचे 9 महिने 5 राशींसाठी ठरणार 'गोल्डन डेज', संपत्तीचे मार्ग होणार मोकळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल