TRENDING:

अरे बापरे! राहु-मंगळची युती पडणार भारी, 2 एप्रिलपर्यंत 'या' राशींना धोका; करावा लागणार संकटांचा सामना

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या, 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/7
अरे बापरे! राहु-मंगळची युती पडणार भारी, 2 एप्रिलपर्यंत 'या' राशींना धोका
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या, 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ शनीच्या मालकीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच मायावी ग्रह राहु विराजमान आहे. मंगळ आणि राहु जेव्हा एकाच राशीत येतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत उग्र मानला जाणारा 'अंगारक योग' निर्माण होतो.
advertisement
2/7
हा योग 2 एप्रिल 2026 पर्यंत सक्रिय राहणार असून, याचा सर्वात जास्त नकारात्मक प्रभाव तीन राशींवर पडण्याची शक्यता आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
मंगळ हा अग्नी तत्त्वाचा ग्रह आहे, तर राहु हा वायू तत्त्वाचा आणि भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. शनीच्या राशीत ही युती होत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढू शकते.
advertisement
4/7
अंगारक योगामुळे लोकांमध्ये प्रचंड राग, चिडचिडेपणा आणि घाई वाढते. या काळात घेतलेले चुकीचे निर्णय मोठे आर्थिक नुकसान किंवा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. ग्रहांची ही 'दुहेरी चाल' 2 एप्रिलपर्यंत अनेकांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरेल.
advertisement
5/7
मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि तो राहूच्या संगतीत आल्याने तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होऊ शकते. विनाकारण खर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा, अन्यथा नोकरीवर संकट येऊ शकते. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे.
advertisement
6/7
मकर: मकर राशीच्या जातकांसाठी ही युती दुसऱ्या स्थानी होत आहे. पैशांच्या व्यवहारात मोठी जोखीम पत्करू नका. कोणालाही उधार दिलेले पैसे परत मिळणे कठीण होईल. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः डोळे किंवा रक्ताशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/7
मीन: मीन राशीच्या लोकांसाठी राहु-मंगळ युती बाराव्या स्थानी होत आहे, जी खर्चाची आणि मानहानीची जागा मानली जाते. कुटुंबात गैरसमजामुळे मोठे वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रागाच्या भरात कोणालाही अपशब्द वापरू नका, अन्यथा तुमची सामाजिक प्रतिमा मलिन होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे बापरे! राहु-मंगळची युती पडणार भारी, 2 एप्रिलपर्यंत 'या' राशींना धोका; करावा लागणार संकटांचा सामना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल