Mobile Numerology: पैशांची तंगी, प्रगती खुंटलीय! मोबाईल नंबरमधील हा अंक घालतोय का घोळ?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mobile Numerology Marathi: आठ हा अंक करिअर, पैसा आणि ज्ञानाशी निगडित आहे. हा अंक आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षितता आणतो. एखाद्याला प्रगती करायची असेल, तर मोबाइल नंबरमध्ये 8 हा अंक असणं गरजेचं आहे. हा अंक कष्ट, नाश, पुनर्जन्म, पुनर्उभारणी आदींचा निदर्शक आहे.
advertisement
1/8

एखादी व्यक्ती कष्ट करणारी असेल, स्वतःवर तिचा विश्वास असेल आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असेल, तर हा अंक खूप चांगला आहे. 8 हा अंक मोबाइल नंबरमध्ये असलेली व्यक्ती आपल्याला दिलेलं काम संतुलन राखून आणि पूर्ण नियोजनाने करते.
advertisement
2/8
या व्यक्ती प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा सकारात्मक बाजू पाहतात आणि नंतर नकारात्मक बाजू. कोणावरही विश्वास ठेवण्याआधी या व्यक्तींचा स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो.
advertisement
3/8
जेव्हा 8 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो, तेव्हा तो नंबर असलेल्या व्यक्ती पैशांचं व्यवस्थापन योग्यरीत्या करतात. पैसे काळजीपूर्वक हाताळतात आणि शहाणपणाने खर्च करतात. दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास असल्याशिवाय या व्यक्ती आर्थिक व्यवहार करत नाहीत. पूर्ण नियोजनानेच या व्यक्ती काम करतात.
advertisement
4/8
जेव्हा 8 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो, तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो अशा व्यक्ती खूप शीघ्रकोपी बनतात. या व्यक्तींना स्वतःच्या वर्तनावर, रागावर नियंत्रण ठेवावं लागतं. या व्यक्ती हेकेखोर असतात. या व्यक्तींना केवळ स्वतःच्या अनुभवांतूनच शिकायचं असतं. इतरांवर ते विश्वास ठेवत नाहीत. या व्यक्ती आपला निर्णय बदलत नाहीत. प्रसिद्धीबाबत विचार करण्यात या व्यक्ती बराच वेळ व्यतीत करतात.
advertisement
5/8
जेव्हा 8 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीन वेळा येतो, तेव्हा असा नंबर असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्ष दुःखी असणं साहजिक असतं. या व्यक्ती 40व्या वर्षानंतर भौतिकवादी बनतात. संपत्तीतच सुख आहे अशी त्यांची धारणा बनते. या व्यक्ती खूप क्रोधी आणि उद्धट बनतात. या व्यक्ती नंतर हावऱ्या बनतात आणि स्थिर वर्तन राखू शकत नाहीत.
advertisement
6/8
जेव्हा 8 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4 किंवा जास्त वेळा येतो, तेव्हा असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्ती खूप अस्थिर असतात आणि त्यांचं आयुष्य तणावाचं असतं. त्यांना सतत बदल हवा असल्यासारखं वाटतं. संपत्तीकडे घेऊन जाणाऱ्या दिशेकडे ते जातात. या व्यक्ती खूप इगो असलेल्या असतात. पैशांशी संबंधित बाबींमध्ये त्यांची जनमानसातली प्रतिमा चांगली नसते.
advertisement
7/8
जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 8 हा अंक एकदाही नसतो, तेव्हा अशा व्यक्तींना पैशांच्या बाबतीत असुरक्षित वाटतं. या व्यक्ती स्वतःच्या मार्गावरून विचलित होऊ शकतात. किंवा अशा व्यक्ती स्वतःकडे असलेलं सर्व काही दुसऱ्यांसाठी गमावून बसतात. या व्यक्तींकडे पैसा असला, तर त्या व्यक्ती तो पैसा गरज नसलेल्या ठिकाणी खर्च करतात. यांच्याकडे पैसा दीर्घ काळ टिकत नाही. या व्यक्तींकडे अधिकार टिकत नाहीत. बजेटिंग ही त्यांची कायमच समस्या असते. या व्यक्ती पैसा आणि ज्ञानाच्या बाबतीत कायमच इतरांवर अवलंबून असतात.
advertisement
8/8
मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 8 असेल, तर असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्तींना आयुष्यात खूप कष्ट करावे लागू शकतात. या व्यक्तींना शिक्षणात यश मिळतं; पण या व्यक्ती कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत. या व्यक्तींची नफा कमावण्याची क्षमता नक्कीच वाढते. तसंच आर्थिक व्यवहार सांभाळण्याची क्षमताही वाढते; मात्र अपार कष्ट केल्यानंतर त्यांना नफा मिळतो. या प्रक्रियेत या व्यक्तींना अनुभव मिळतो; मात्र अति कामामुळे त्यांना आरोग्याची समस्या उद्भवते आणि ते चिंतेचं कारण बनतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mobile Numerology: पैशांची तंगी, प्रगती खुंटलीय! मोबाईल नंबरमधील हा अंक घालतोय का घोळ?